सीसीटीव्हीचा देखावा ठरला बिनकामाचा

राजेश मोरे
मंगळवार, 30 मे 2017

गस्ती पथकाचाही बार फुसका - कठोर कारवाई हाेणार कधी, याची लोकांना प्रतीक्षाच

कोल्हापूर - ‘सेल्फ सिटी’अंतर्गत शहरात सीसीटीव्हीचे जाळे असतानाही एकामागोमाग एक चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत आहेत. तसेच ‘चेन स्नॅचर’वरील कारवाईच शून्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून सुरू केलेल्या गस्ती पथकाचाही बार फुसका ठरत आहे. 

गस्ती पथकाचाही बार फुसका - कठोर कारवाई हाेणार कधी, याची लोकांना प्रतीक्षाच

कोल्हापूर - ‘सेल्फ सिटी’अंतर्गत शहरात सीसीटीव्हीचे जाळे असतानाही एकामागोमाग एक चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत आहेत. तसेच ‘चेन स्नॅचर’वरील कारवाईच शून्य आहे. मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून सुरू केलेल्या गस्ती पथकाचाही बार फुसका ठरत आहे. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. महिलांची छेडछाड असो की निर्जनस्थळी व गर्दीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांनी महिला गस्ती पथकाची सुरवात केली. एक महिला पोलिस अधिकाऱ्यासह महिला पोलिस कर्मचारी व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा यात समावेश केला. त्या पथकाला संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात आला. शहर परिसरात फिरणाऱ्या या पथकामुळे छेडछाड व चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्यात सुरवातीला मोठे यश आले; मात्र कालांतराने हे पथक कोठे गेले, हे कोणालाच समजले नाही. तसे चेन स्नॅचिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलेत. सध्या पोलिसांची गस्त म्हणजे नावालाच असाच प्रकार सुरू आहे.

पोलिस दैनंदिन कामाच्या नावाखाली पोलिस ठाण्यातच अधिक दिसत आहेत. हेच पोलिस जर चौका चौकात अगर हद्दीतील निर्जनस्थळी नुसते उभे राहिले तर चेन स्नॅचिंगसह घरफोड्याच्या प्रकारावर अंकुश ठेवता येईल. 
सेल्फ सिटीअंतर्गत तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या काळात नऊ कोटी रुपये खर्चून शहरात सीसीटीव्ही बसवले. शहरातील चौका चौकात १६५ कॅमेरे बसवले. त्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिस मुख्यालयात स्वतंत्र यंत्रणा ठेवण्यात आली; पण या सीसीटीव्हीला ‘लाईट मोड’ नाही. त्यामुळे अंधारातील फुटेजच प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा कॅमेऱ्याचे अस्तित्व म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, असे झाले आहे. अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानेही नागरिकही पोलिसांना चोरट्यांसंबधी माहिती देण्यास पुढे येत नाहीत. महिलांत दहशत निर्माण करणाऱ्या चेन स्नॅचरच्या बंदोबस्तासाठी नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

पोलिसांकडून नागरिकांना हे अपेक्षित
महिलांचे गस्ती पथक सुरू करा
चौका चौकांत निर्जनस्थळी पोलिसांचे अस्तित्व आवश्‍यक
शहरातील सीसीटीव्हीतील उणिवा दूर करा
चोरीचे सोने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा

Web Title: kolhapur news cctv camera fail