भोगावती नदीवरील बालिंगा पूल सुस्थीतीत - मंत्री चंद्रकांतदादा पाटील 

पंडित कोंडेकर
सोमवार, 5 मार्च 2018

इचलकरंजी - बालिंगा (जि. कोल्हापूर) येथील भोगावती नदीवरील पूल स्ट्रक्‍चरल ऑडीटच्या अहवालानुसार वाहतुकीसाठी सुस्थीतीत असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. या पुलाची कांही आवश्‍यक दुरुस्ती कामे लवकरच करण्यात येणार आहे, असल्याचेही श्री.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थीत केला होता. त्याला मंत्री श्री.पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. भोगावती नदीवर बालिंगा येथे ब्रिटीश कालीन पूल आहे. या पूलावर चार साखर कारखान्यांची वाहतूक सुरु असते. तो जीर्ण झाल्यामुळे कोसळण्याची भिती असल्यामुळे या पूलाचे स्ट्रक्‍चरल ऑडीट केले आहे काय, अशी विचारणा आमदार हाळवणकर यांनी केली होती.

त्याचे सविस्तर लेखी स्पष्टीकरण मंत्री पाटील यांनी दिले आहे. पूलाचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात आले आहे. त्याच्या निष्कर्षानुसार पूल वाहतूकीसाठी सुस्थीतीत असून कांही आवश्‍यक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. लवकरच या कामाची निविदा काढली जाणार आहे, असे मंत्री पाटील यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. 

सध्या या पूलावरुन सुरळीत वाहतूक सुरु आहे. या पूलावरुन जात असलेला रस्ता हा केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे रस्त्याचे हस्तांतरण केंद्र शासनाकडे करण्याची कार्यवाही सुरु आहे. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची सुधारणा करणे व देखभाल दुरुस्ती केंद्र शासनाकडून होणे अपेक्षीत असल्याचे उत्तरात मंत्री पाटील यांनी नमूद केले आहे.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment