भाजप - शिवसेना एकत्र आल्यास विरोधी पक्षांचा खातमा - चंद्रकात पाटील

सदानंद पाटील 
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - राज्यात या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या. या तीनही निवडणुकीत भाजप - शिवसेना स्वतंत्र लढूनही त्यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. यावरुन एकच गोष्ट सिध्द होत आहे ती म्हणजे, जर राज्यात भाजप - शिवसेना एकत्र आली तर एकही विरोधी राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्‍लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. 

मंत्री पाटील म्हणाले, या महिन्यात पहिली निवडणूक ही पालघर लोकसभा मतदार संघाची झाली. येथे भाजप, शिवसेना, कॉंग्रेसने आपले उमेदवार उभे केले. यात भाजपचा उमेदवार विजयी झाला तर दुसऱ्या क्रमांकाची मते ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली. यानंतर सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यातही भाजप - शिवसेना एकमेकाविरुध्द लढली. या सहापैकी पाच जागा भाजप - सेनेने मिळवल्या. लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही असाच राहिला आहे. तर कालच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही चार पैकी 3 जागावर भाजप - सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एक जागा अपक्षाला मिळाली आहे.

कोकण, मुंबई, नाशिक या ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज ही विरोधकांना धडकी भरवणारी आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप - शिवसेना एकत्र राहिली तर राज्याला स्थिर सरकार मिळेल, याचा पुनरुच्चार मंत्री पाटील यांनी केला. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment