कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्षांना घरचा आहेर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना संधी देणार असल्याचे वक्‍तव्य दोनच दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी केले होते. मात्र अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद बदलाचा विषयच नसल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत शेळके यांना घरचा आहेर दिला. 

हातकणंगले तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे नेते अरुण इंगवले यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी योगदान दिले. त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा शब्द पालकमंत्री पाटील यांनी दिला होता. सत्ता स्थापनेत शौमिका महाडिक यांचे नाव प्रभावी ठरल्याने त्यांना पहिल्यांदा अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र सव्वा वर्षानंतर अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने इंगवले अस्वस्थ आहेत. त्याची दखल भाजपने घेतली असून त्यांना अध्यक्ष करणार असल्याचे वक्‍तव्य शेळके यांनी केले होते. याबाबत आज मंत्री पाटील यांना विचारले असता भाजपचा अध्यक्ष सव्वा वर्षे राहणार असल्याचे सांगत महाडिक यांच्या राजीनाम्याचा विषय धुडकावून लावला. त्यांच्या या वक्‍तव्याने भाजपतच अध्यक्ष बदलाबाबत ताळमेळ नसल्याचे उघड झाले. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment