शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कंपन्यांकडून टेंडर - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

गारगोटी - शेतकऱ्यांच्या बावीस प्रकारच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आगामी काळात शासन देशातील मोठ्या कंपन्यांकडून टेंडर मागविणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गारगोटी - शेतकऱ्यांच्या बावीस प्रकारच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आगामी काळात शासन देशातील मोठ्या कंपन्यांकडून टेंडर मागविणार आहे. यात संबंधित कंपनीला तोटा झाल्यास शासन भरपाई देईल. या प्रक्रियेत भुदरगड तालुका संघाने सहभाग घेतल्यास खरेदी-विक्रीची एक पारदर्शक प्रणाली अस्तित्वात येईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

बाजारात साखरेचे दर उतरत असल्याने साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने कारखान्यांना योग्य ती मदत करून तोडगा काढावा. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन साखर दराचा प्रश्न मार्गी लावावा.

-  के. पी. पाटील, माजी आमदार

येथील भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सहकारमहर्षी बी. जी. देसाई बझारच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई प्रमुख
पाहुणे होते.         

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात चौफेर विकास होत आहे. त्यांनी गारगोटीत नगरपंचायत होण्यासाठी व प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.  

- बजरंग देसाई, माजी आमदार   

अध्यक्ष प्रा. बाळ देसाई म्हणाले, ‘‘तालुका संघ लाखो रुपयांनी तोट्यात होता. संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून संघ नफ्यात आणला. संचालक प्रा. एच. आर. पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रा. बाळ देसाई यांनी प्रास्ताविक केले.

राहुल देसाई, रणजित पाटील, विठ्ठलराव खोराटे, पंडितराव केणे, नाथाजी पाटील, प्रकाश पाटील, अलकेश कांदळकर, आर. एस. कांबळे, रणजित पाटील (मुरगूड), धैर्यशील देसाई, धनाजी देसाई, प्रदीप पाटील, उपाध्यक्ष एम. डी. पाटील, हिंदुराव देसाई, के. आय. चौगले, देवेंद्र मोरबाळे, नंदकुमार ढेंगे, अंकुश चव्हाण, पांडुरंग पाटील, सदाशिव मोरे, सागर राणे, शिराज देसाई, रामचंद्र सणगर, संतोष पाटील, राकेश आबिटकर, सुनील पाटील, अमित देसाई, व्यवस्थापक विश्वास वरपे, विलास झोरे, शरद मोरे आदी उपस्थित होते. संचालक विजय कोटकर यांनी आभार मानले.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment