शहर स्वच्छतेसाठी लोकजागृती व्हावी - प्रतिमा पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

कोल्हापूर - स्वच्छतेची जबाबदारी केवळ शासनाची किंवा महापालिकेची नसून, ती आपलीही आहे. शहर स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, त्यासाठी लोकजागृती करणे आवश्‍यक आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांनी प्रथम पुढे यावे, मदतीकरिता महापालिकेचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन प्रतिमा पाटील यांनी केले.

कोल्हापूर - स्वच्छतेची जबाबदारी केवळ शासनाची किंवा महापालिकेची नसून, ती आपलीही आहे. शहर स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, त्यासाठी लोकजागृती करणे आवश्‍यक आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांनी प्रथम पुढे यावे, मदतीकरिता महापालिकेचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन प्रतिमा पाटील यांनी केले.

आमदार सतेज पाटील व प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे क्‍लीन कोल्हापूर मोहिमेंतर्गत आज सौ. पाटील यांनी महापालिकेस ५६ कचराकुंड्या दिल्या. या वेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महापौर स्वाती यवलुजे अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेतर्फे महापौर यवलुजे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कचराकुंड्या स्वीकारल्या. शहरातील मुख्य ५० चौकांत या कुंड्या बसविण्यात येतील. 

आयुक्त डॉ. चौधरी यांनी स्वच्छतेबाबतची कर्तव्ये महापालिका चांगल्या रीतीने पार पाडत राहील. यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे, असे आवाहन केले.  या वेळी क्‍लीन कोल्हापूर मोहिमेत सहभागी झालेल्या सामाजिक संस्थांचा सत्कार झाला. यात रोटरी क्‍लब ऑफ गार्गीजच्या विशाखा आपटे, इनरव्हील ब्लब मेनच्या श्रमिष्ठा चौगले, मनीषा संकपाळ, अमिताभ फॅन्स क्‍लब वर्ल्ड वाईडचे ॲड. इंद्रजित चव्हाण, रोटरी क्‍लब ऑफ सनराईजचे गौरव शहा, इंगेडियन्स क्‍लबचे आकाश कोरगावकर, ‘क्रेडाई’चे महेश जाधव, ‘अवनी’च्या अनुराधा भोसले, एकटी संस्थेच्या शैला पाटील, गार्डन क्‍लबच्या सुमिती देशमुख, धनश्री पाटील, नीलम मोरे, ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगले, ‘रोटरी करवीर’चे विशाल जांभळे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमास उपमहापौर सुनील पाटील, शिक्षण सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, प्रभाग समितीच्या सभापती प्रतीक्षा पाटील, ऋतुराज पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते. विजय वणकुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: kolhapur news city clean public awareness pratima patil