कोल्हापुरात ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावला

राजकुमार चौगुले
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. आज दिवसभरात एकदाही सुर्य दर्शन झाले नाही. या अशा ढगाळ वातावरणामुळे तुडतुडे व फुल किड्यांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. आज दिवसभरात एकदाही सुर्य दर्शन झाले नाही. या अशा ढगाळ वातावरणामुळे तुडतुडे व फुल किड्यांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

पहाटेपासूनच असणारे कुंद वातावरण व उष्मा यामुळे भाजीपाला पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. वांगी, फ्लॉवर कोबी आदी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता कृषी विभागातून व्यक्त करण्यात येत आहे. 

अशा ढगाळ हवामानामुळे मिरची, टोमॅटो, वांगी यावर पुलकिडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.  हे किटक विषारीजन्य रोगाचा प्रसार करतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाण घट होऊ शकते. याचे नियंत्रण करण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट बोर्ड (यलो स्टिकी ट्रॅप) हे लावायचे त्यामुळे पांढरी माशी याकडे आकर्षित होते. तसेच निळे चिकट बोर्ड लावले की फुलकिडे आकर्षित होतात. या कीडींच्या तीव्रतेवरून फवारणी कधी करायची याचा अंदाज येतो. फवारणीची गरज वाटल्यास लॅमडा सायलोट्रीन १५ मिली आणि ब्लु काॅपर ३० ग्रॅम स्टेप्टोसायकरीन तीन ग्रॅम याची फवारणी करावी. जर पिक फुलावर असताना ०-५२-३४ हे विद्राव्य खत  ७५ ग्रॅम १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून कीटकानाशकाबरोबरच्या संध्याकाळी चारच्या सुमारास फवारावे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आल्यास मेटॅरायझम बुरशी अर्धाकप दुध १५ लिटर पाण्यात मिसळून फवारले असता पांढऱ्या माशीचा बंदोबस्त होतो असा शेतकऱ्याचा अनुभव आहे. हे कीटकनाशक कृषी महाविद्यालयात उपलब्ध आहे.

- पांडुरंग मोहिते, कृषी किटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय कोल्हापूर

सध्या जिल्ह्यात ढगाळ हवामानाबरोबर हलक्या पावसाची ही शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची भुरभुर अनुभवास येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास रब्बी ज्वारी काळी पडून चाऱ्याचा दर्जाही खालावणार आहे. असेच गव्हाचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन दिवसांत वातावरणात मोठा बदल झाल्याने त्याचा परिणाम सर्वच शेतकामावर झाला आहे

Web Title: Kolhapur News cloudy weather in District