वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा; अन्यथा वेतनवाढ रोखू - आयुक्‍त चौधरी

विकास कांबळे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कोल्हापूर - कराच्या वसुलीतील दिरंगाई पाहून आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा, अन्यथा वेतनवाढ रोखली जाईल, अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. कराच्या वसुलीला गती येणार आहे.

कोल्हापूर - कराच्या वसुलीतील दिरंगाई पाहून आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा, अन्यथा वेतनवाढ रोखली जाईल, अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. कराच्या वसुलीला गती येणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत जकात होती. जकात बंद करून त्याला पर्याय म्हणून एलबीटी (लोकल बॉडी टॅक्‍स) लागू केला, मात्र या कराला व्यापाऱ्यांनी सुरवातीपासून विरोध केल्यामुळे त्याची अपेक्षित वसुली नव्हती. व्यापारी जो व्यवसाय दाखवतील त्यावर एलबीटी आकारला जाईल, असे सांगण्यात आले. तरीही एलबीटी व्यापाऱ्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे महापालिकेने नोटिसा काढल्या आणि त्याची वसुली सुरू केली.

एलबीटीची वसुली सुरळीत होते, न होते तोच एलबीटी शासनाने रद्द केला. आणि जीएसटी लागू केला. त्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला. यानंतर उत्पन्न मिळवून देणारा दुसऱ्या क्रमाकांचा विभाग म्हणजे घरफाळा विभाग. दरम्यानच्या काळात सर्वत्रच बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आले. त्यामुळे या विभागाने घरफाळा विभागाला मागे टाकत महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्यात दुसरा क्रमांक पटकाविला. 

या विभागाकडून महापालिकेला उत्पन्न चांगले मिळत होते, मात्र नोटाबंदीच्या काळानंतर मर्यादा आल्या. नोटाबंदीचा सर्वात अधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला. मार्च अखेर जवळ आल्याने आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

बैठकीत सर्व विभागांच्या वसुलीची माहिती घेतली. मात्र अपेक्षित वसुली होत नसल्याचे निदर्शनास आले. सर्व अधिकाऱ्यांना वसुलीची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या विभागाच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, त्या विभागातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत कोणाचीही वेतनवाढ केली जाणार नाही, असे डॉ. चौधरी यांनी अधिकाऱ्यांच्या सुनावले.

Web Title: Kolhapur News Commissioner Choudhari comment