रेडझोनमध्ये अवैध बांधकामे चालू देणार नाही - पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - रेडझोनमधील अवैध बांधकामे असोत अथवा अन्य काही, या शहरात कोणतेही बेकायदेशीर काम सरकार चालू देणार नाही. रेडझोनसह नाल्यात होणारी अवैध बांधकामे हा तर मोठा विषय असून, यात आता लक्ष घालावेच लागेल, असे महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर - रेडझोनमधील अवैध बांधकामे असोत अथवा अन्य काही, या शहरात कोणतेही बेकायदेशीर काम सरकार चालू देणार नाही. रेडझोनसह नाल्यात होणारी अवैध बांधकामे हा तर मोठा विषय असून, यात आता लक्ष घालावेच लागेल, असे महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीनंतर शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरवासीयांची आणि विशेषतः उपनगरातील नागरिकांची दैना उडाली. संरक्षक भिंती, वाहने अक्षरशः पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, की रेडझोनमधील अवैध बांधकामे हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे, याकडे आता लक्ष द्यायलाच हवे. शहरातील बेकायदेशीर बांधकामेच काय, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य हे सरकार चालू देणार नाही. त्यामुळे रेडझोनच्या विषयातही आपल्याला हात घालावाच लागणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्व सूचना ऐकणार

पालकमंत्री मराठा आरक्षणाबाबत म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी केलेल्या सर्व घोषणांची अंमलबजावणी होईलच. मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करणे अथवा मराठा शिष्टमंडळाच्या सूचनांबाबत सविस्तर चर्चा करण्यावर मर्यादा पडत असल्यानेच उपसमिती नेमली आहे. ही समिती सर्व मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल. प्रत्येकाच्या सूचना ऐकून घेऊन मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

पुजाऱ्यांबाबत जिल्हाधिकारी अहवाल देणार
अंबाबाई मंदिरात हक्कदार पुजाऱ्याऐवजी पगारी पुजारी नेमण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुभेदार यांना अहवाल द्यायला सांगितले होते. हा अहवाल आजच जिल्हाधिकारी राज्य शासनाला सादर करणार आहेत. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

Web Title: kolhapur news constructions in readzone will not allowed