अन्‌ काही वेळात न्यायालयाची जुनी इमारत झाली चकाचक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर - ‘सकाळ’च्या या स्वच्छता मोहिमेंतर्गत न्यायाधीश, वकिलांनीही आज सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत अर्थात राधाबाई बिल्डिंगची स्वच्छता केली. या मोहिमेचा प्रारंभ मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट यांच्या हस्ते झाला. या वेळी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते राजाराम महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

कोल्हापूर - ‘सकाळ’च्या या स्वच्छता मोहिमेंतर्गत न्यायाधीश, वकिलांनीही आज सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत अर्थात राधाबाई बिल्डिंगची स्वच्छता केली. या मोहिमेचा प्रारंभ मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट यांच्या हस्ते झाला. या वेळी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते राजाराम महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

सकाळी साडेसातच्या सुमारास मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छतेस सुरुवात केली. राधाबाई बिल्डिंगच्या समोर असलेल्या राजाराम महाराजांच्या पुतळ्यासमोरील स्वच्छतेला सुरुवात होताच बघता बघता इमारतीचा कानाकोपरा स्वच्छ झाला. 

जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी, जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले, जिल्हा न्यायाधीश केदार जोगळेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, वरिष्ठस्तर न्यायाधीश अजित यादव, वरिष्ठस्तर न्यायाधीश प्रवीण खराटे, कनिष्ठस्तर न्यायाधीश पी. एम. उन्हाळे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवात होताच बरेच दिवस सुना सुना असलेला राधाबाई बिल्डिंगचा परिसर आज सकाळी गजबजून गेला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही येथे स्वच्छतेसाठी हातभार लावला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांच्यासह माजी अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी राजाराम महाराजांचा पुतळा स्वच्छ केला. पाण्याने चबुतराही स्वच्छ करून हा परिसर चकाचक केला. 

ॲड. अजित मोहिते, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. राजेंद्र मंडलिक, सरकारी वकील अलताफ पिरजाद, ॲड. राजेंद्र किंकरे, ॲड. श्रेणिक पाटील, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किरण खटावकर, लोकल ऑडिटर ॲड. प्रशांत पाटील, ॲड. संदीप चौगुले, ॲड. धैर्यशील पवार, ॲड. मुकुंदराज मोरे-पाटील, ॲड. शुभांगी निंबाळकर, ॲड. पूजा कटके, ॲड. कुलदीप कोरगावकर, जिल्हा विधी सेवाचे अधीक्षक संभाजी पाटील, सर्जेराव सावंत, कोल्हापूर जिल्हा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील, श्री. खुपेरकर, महेश भंडारे, एस. टी. जाधव, राजीव माने, कु. प्रत्ययंच्या प्रकाश मोरे, सूर्यकांत डंबे, ॲड. अतुल जाधव, विजय महाजन, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, संतोष जाधव, श्रीकांत सुतार, सतीश देसाई, शशिकांत वायंगणकर, शिवानंद तोडकर, प्रवीण खोत, प्रशांत पाटील, संदीपसिंग रजपूत, अमित यादव, विनायक भोसले, विवेक भोसले, श्रेयस सुतार, नंदकुमार पाटील, संपत कांबळे, राजेश यादव, परसू कांबळे, सागर कांबळे, रमेश शिंगे, अशोक आवळे, दयानंद कांबळे, अशोक चौगुले, भिकाजी पाटोळे आदींसह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: kolhapur news court Cleanliness campaign