"सीपीआर"मधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पंडित कोंडेकर
मंगळवार, 13 मार्च 2018

इचलकरंजी - कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. याबाबतचा प्रश्‍न आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधान सभेतील चर्चेवेळी उपस्थीत केला होता.

इचलकरंजी - कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. याबाबतचा प्रश्‍न आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधान सभेतील चर्चेवेळी उपस्थीत केला होता.

दरम्यान, रुग्णालयातील कचरा उठाव करणाऱ्या मक्तेदाराची देय रक्कम प्रलंबीत असल्याची कबुली श्री. महाजन यांनी यावेळी दिली. ती बिले तातडीने आदा करण्यात येईल, असे उत्तरही त्यांनी या प्रश्‍नाला दिले. 

विधान सभेतील चर्चेवेळी आमदार हाळवणकर यांनी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालया संदर्भातील दोन प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी उत्तर दिले. सीपीआर रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्यामुळे मैलामिश्रीत व रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिळत असल्याचे जानेवारीमध्ये निदर्शनास आले होते. हे खरे आहे काय, अशी विचारणा आमदार हाळवणकर यांनी केली. मात्र श्री. महाजन यांनी असा प्रकार घडला नसल्याचे उत्तर दिले आहे.

रुग्णालयातील कचरा उठाव करणाऱ्या मक्तेदारांची देय रक्कम गेली दहा महिने अदा केली नसल्यामुळे कचरा उचलण्यास विलंब होत असल्याबाबत आमदार हाळवणकर यांनी प्रश्‍न उपस्थीत केला. त्यावरही श्री. महाजन यांनी स्पष्टीकरण देतांना देय रक्कम प्रलंबीत असल्याचे मान्य केले आहे. कचरा उठावाचे काम नेचर इन नीड हा कंपनीकडे आहे. डिसेंबर 2017 चे देयक प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर कोषागार कार्यालयाकडे देयक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे हे देयक पारीत होताच संबंधित कंपनीस देय रक्कम आदा केली जाईल, असे स्पष्टीकरण ही श्री.महाजन यांनी दिले. मे ते नोव्हेबंर 2017 पर्यंतची देय रक्कम अदा केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या संदर्भात शासनाकडून चौकशी करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही या विषयावरील चर्चेवेळी श्री.महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kolhapur News CPR CTP project issue in Vidhansabha