सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधी चोरी प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला सीआयडीच्या पथकाने काल रात्री पुण्यातील पिंपळे गुरव येथून अटक केली. न्यायालयाने त्याला 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे सीआयडीचे प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील याच्या आष्टासह तीन घरांवर तपास यंत्रणेनी छापे टाकले. 

वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक कॉलनीतील एका फ्लॅटमधील 12 मार्च 2016 झालेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलनगर, मिरज) याला सांगली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची रक्कमही जप्त केली. त्यानंतर या फ्लॅटची तपासणी करताना तेथे पुन्हा 1 कोटी 31 लाख 29 हजारांची रोकड सापडली. याप्रकरणी कोडोली पोलिसांत गुन्हा नोंद झाला. अटकेनंतर काही दिवसांनंतर पन्हाळा येथील न्यायालयाने मुल्लाचा जामीन अर्ज मंजूर केला व त्याला दर शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेश दिले होते; पण कोडोली पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी पहिल्याच शनिवारी मुल्ला आला नाही. पोलिसांनी त्याचा तपास केला असता त्यात मुल्ला साथीदार विनायक जाधव (वय 40) याच्याकडून 70 लाख घेऊन पसार झाला. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला (रा. बेथलनगर, सांगली) आणि प्रवीण सावंत (रा. वासूद, सांगोला) यांच्यावर गुन्हे दाखल झाले. 

सीआयडीकडे संशयित घनवट, चंदनशिवे शरण आल्यानंतर दीपक पाटील शरण आला. संशयित हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलला मध्यवर्ती बस स्थानकातून अटक केली. पोलिसनाईक कुलदीप कांबळे हा न्यायालयात हजर झाला. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला हा पिंपळे गुरव (जि. पुणे) येथे सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. काल रात्री त्याला ताब्यात घेतल्यानंतर पन्हाळा न्यायालयात हजर केल्यावर त्याला पोलिस कोठडी मिळाली. 

भाड्याच्या घराचा आसरा 
पिंपळे गुरव (जि. पुणे) सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात मैनुद्दीन राहत असल्याची माहिती सीआयडीचे प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या हाती लागली. पुणे व कोल्हापूर सीआयडीच्या पथकाने संयुक्तरीत्या तेथे काल रात्री छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. 

Web Title: kolhapur news crime