खासदार उदयनराजेंवर कोणत्याही क्षणी कारवाई - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

कोल्हापूर - खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई केली जाईल. कायदा सर्वांसाठी समान आहे. गरज पडल्यास अटकेचीही कारवाई केली जाईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

लोणंदस्थित (ता. खंडाळा) औद्योगिक वसाहत येथे तीन महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या मालकाला खंडणीसाठी धमकावून मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या साथिदारांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयितांना अटक केली. याप्रकरणी उदयनराजे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो दोन महिन्यांपूर्वी फेटाळला. याबाबत बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसलेंवर कोणत्याही क्षणी कारवाई केली जाईल. गरज भासल्यास त्यांच्यावर अटकेचीही कारवाई केली जाईल. यापूर्वी याप्रकरणी आतापर्यंत नऊ संशयितांना अटक केली असून, त्याबाबतचे पुरावेही तपासले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: kolhapur news crime on udayanraje bhosale