आयपी ॲड्रेस हॅक करून ‘नायजेरिया फ्रॉड’चा फंडा

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  ‘आयपी’ ॲड्रेस हॅक करून होणाऱ्या फसवणुकीला ‘नायजेरिया फ्रॉड’ असे म्हटले जाते. आलेले ईमेल कोठून आले आहेत, समजत नाही. आलेले कॉल हे इतर ठिकाणाहून आलेत असे दाखविले जाते. दोघांतील संवाद, संपर्कातील दुवा असलेल्या इंटरनेटमधील ‘प्रॉग्झी सर्व्हर’-सॉफ्टवेअरवरून अशा प्रकारचे क्राइम घडविले जाते. याद्वारे फसवणुकीत मुख्य गुन्हेगार मिळविणे कठीण असते. त्यामुळे फसवणूक होणारच नाही, याची दक्षता घेणेच महत्त्वाचे ठरते.

कोल्हापूर -  ‘आयपी’ ॲड्रेस हॅक करून होणाऱ्या फसवणुकीला ‘नायजेरिया फ्रॉड’ असे म्हटले जाते. आलेले ईमेल कोठून आले आहेत, समजत नाही. आलेले कॉल हे इतर ठिकाणाहून आलेत असे दाखविले जाते. दोघांतील संवाद, संपर्कातील दुवा असलेल्या इंटरनेटमधील ‘प्रॉग्झी सर्व्हर’-सॉफ्टवेअरवरून अशा प्रकारचे क्राइम घडविले जाते. याद्वारे फसवणुकीत मुख्य गुन्हेगार मिळविणे कठीण असते. त्यामुळे फसवणूक होणारच नाही, याची दक्षता घेणेच महत्त्वाचे ठरते.

इंटरनेटद्वारे धमकी, ब्लॅकमेलिंग करणे, चुकीची माहिती देणे, बक्षीस मिळाले असे सांगून फसवणूक करण्यासाठी प्रॉग्झी सर्व्हर ही पद्धत वापरली जाते. कोणीही, केव्हाही याची शिकार बनू शकतो. वेळीच काळजी न घेतल्यास तुमच्या अकाउंटमधील रक्कम काढली जाऊ शकते. आलेला कॉल हा बॅंकेतील असल्याचे भासविले जाते.

मोबाइलवर संबंधित बॅंकेचे नाव आणि क्रमांक येऊ शकतो. तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डवरील क्रमांक विचारूनसुद्धा ही फसवणूक होते. यासाठी पासवर्डसुद्धा गरजेचा नसतो. नायजेरियन देशांचे संदर्भ घेऊन काही प्रगत राष्ट्रांतून अशा पद्धतीची फसवणूक झाल्याची काही उदाहरणे आहेत. एखादा ई-मेल आला, तर तो येण्यासाठी ‘आयपी ॲड्रेस’ तयार होतो. 

तुम्ही ई-मेल उघडल्यानंतर तेथेही ‘आयपी ॲड्रेस’ तयार होतो. एखाद्याला धमकीचा ई-मेल आला असेल, तर तो कोठून आला, हे पाहण्यासाठी सर्व्हरचा वापर केला जातो. त्यावरून संबंधित कंपनीकडून ज्या आयडीवरून ई-मेल आला, त्याच्यापर्यंत पोचता येते. यासाठी कंपनीची मदत महत्त्वाची ठरते. ‘मॅक’ ॲड्रेस पाहून, असे ई-मेल कोठून आले याची माहिती पोलिसांना मिळू शकते.

‘प्रॉग्झी सर्व्हर’ फसवणुकीचे केंद्र
एखादा ई-मेल पाठविला, तर तो कोठून पाठविला हे दुसऱ्याला-पोलिसांना समजू नये, यासाठी ‘प्रॉग्झी सॉफ्टवेअर’द्वारे सर्व्हरचा वापर होतो. यातून आयपी ॲड्रेस हॅक केला जातो. या सर्व्हरमुळे तुम्ही कोठून ई-मेल केला आहे, याची माहिती मिळू शकत नाही. ती मिळविण्याचा प्रयत्न केला, तर ती दुसरी कोणतीही आणि चुकीची असू शकते. त्यामुळे फ्रॉड(ऑनलाइन फसवणूक) करण्यासाठी ‘प्रॉग्झी सर्व्हर’चा वापर अधिक केला जात असल्याचे पोलिस रेकार्डवरून दिसून येते.

अतिरेक्‍यांकडून प्रॉग्झी सर्व्हरचा वापर
पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील तरुणीला अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी या सर्व्हरचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. संघटनेत सहभागी होण्यासाठी आमिषे दाखविली जातात. संघटना कशी योग्य आहे, हे दाखविण्यासाठी इंटरनेटचा वापर होतो. ई-मेलचा वापर होतो. हे ई-मेल कोठून येतात, हे समजू नये, यासाठी प्रॉग्झी सर्व्हरचा वापर केल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले गेले.

Web Title: kolhapur news cyber crime report