दर्शन शहा खुन प्रकरणात चारू चांदणे दोषी 

लुमाकांत नलावडे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - शाळकरी मुलगा दर्शन शहाचे खंडणीसाठी अपहरण करून, खून करून, पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात चारू चांदणेला आज न्यायालयाने दोषी ठरवले.

कोल्हापूर - शाळकरी मुलगा दर्शन शहाचे खंडणीसाठी अपहरण करून, खून करून, पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात चारू चांदणेला आज न्यायालयाने दोषी ठरवले.

देवकर पाणंद परिसरातील सुश्रुषा नगरात 2012 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी दर्शनच्या घराजवळीलच चांदणेला अटक केली होती. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.डी.बिले यांच्या न्यायालयात खटला चालला. फिर्यादीच्यावतीने ऍड.उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. उद्या (ता.10) पुढील सुनावणी असून त्यामध्ये शिक्षा सुणावण्याची शक्‍यता आहे. 

देवकर पाणंद परिसरातील सुश्रुषा नगरात स्मीता शहा या त्यांच्या आई आणि मुलगा दर्शन सोबत राहत होत्या. त्यांची घरी पुरुष कोणीही नव्हते. घरा समोरील चारू चांदणे हा नेहमी त्यांच्या घरी ये-जा करीत होता. दर्शन त्याला मामा म्हणून बोलत होता. दर्शन हा शाळेला जात होता.25 डिसेंबर 2012 ला त्याचे अपहरण झाले. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक यशवंत केडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याचा तपास केला. तेंव्हा शहा यांच्या घरासमोरीलच चारू चांदणेवर संशय आला. त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. तेंव्हा दर्शन शहाचे अपहरण करून, खून करून शेजारील विहिरीत त्यांचा मृतदेह टाकल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे चांदणेला अटक केली. 

दरम्यानच्याकाळात शहा यांच्या घरासमोर पंचवीस तोळे सोने मागणीसाठी त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात पुढे आले. त्याने एका नगरसेवकाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ही कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याल अटक करून न्यायालयात हजर केले. चार्टशीट दाखल केले. यानंतरच्या सुनावणीत चांदणेने स्वतःहून आपली नार्को टेस्ट करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. पुढे त्याचे ब्रेन मॅम्पींग सुद्धा झाले. मला गुन्ह्यात अडकवले आहे. मी दोषी नाही असे त्याचे म्हणणे होते. मात्र पुढे याची सुनावणी सुरू झाली. फिर्यादीकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. तर आरोपीच्यावतीने ऍड. पीटर बारदेस्कर यांनी काम पाहिले. 

Web Title: Kolhapur News Darshan Shah murder case