बडतर्फे असूनही शिक्षिकेला दिड वर्षे पगार; दहा जणांना कारणे दाखवा नोटीस

राजेंद्र होळकर
गुरुवार, 3 मे 2018

इचलकरंजी - जिल्हा परिषदेच्या शाळेतून बडतर्फ केले असतानाही तब्बल दिड वर्षे हातकणंगले तालुक्‍यातील एका शिक्षीकेचा पगार नियमित काढल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तत्कालीन तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी, केंद्र मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, कार्यालयीन अधिक्षकांसह दहा जणाना कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. याप्रकरणाने शैक्षणीक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी - जिल्हा परिषदेच्या शाळेतून बडतर्फ केले असतानाही तब्बल दिड वर्षे हातकणंगले तालुक्‍यातील एका शिक्षीकेचा पगार नियमित काढल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तत्कालीन तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी, केंद्र मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, कार्यालयीन अधिक्षकांसह दहा जणाना कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. याप्रकरणाने शैक्षणीक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शाहुवाडी तालुक्‍यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये हातकणगंले तालुक्‍यातील  एक शिक्षीका अध्यापनाचे काम करीत होती. ती शाहुवाडी तालुक्‍यातून हुपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदलीवर आली. शाळेत अध्यापनाचे काम न करता बेकायदेशिरपणे गैर हजर राहू लागली. तिच्या या अनाधिकृत गैर हजेरीची बाब शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये संबंधीत शिक्षीका दोषी असल्याचे आढळल्याने तिला शिक्षण खात्यातून बडतर्फ केले.

ही माहिती तालुक्‍याच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यासह त्या शिक्षीकेच्या शाळेच्या मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, केंद्र मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयीन अधिक्षक, क्‍लार्क आदींना माहिती होती. तरीदेखील या बडतर्फ शिक्षीकेचा तब्बल दिड वर्षाचा पगार नियमित काढून, तिच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. हा वर्ग झालेला पगार संबंधीत बडतर्फ शिक्षीकेने खात्यातून काढला देखील.

हा गंभीर प्रकार तालुक्‍याचे सध्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी यांची चौकशी सुरु केली. तर या चौकशीमध्ये संबंधीत बडतर्फ शिक्षीकेचा सुमारे दिड वर्षाचा 5 लाख 56 हजार 796 इतक्‍या रुपयांचा नियमित पगार काढण्यात आले असल्याचे उघड झाले. तसेच याची माहिती श्री. उकिर्डे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. वरिष्ठांनी यांची गांभिर्याने दखल घेवून याप्रकरणी बडतर्फ शिक्षीकेचा नियमित पगार काढलेल्या त्या कालावधीमधील तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यासह त्या शिक्षीकेच्या शाळेच्या मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, केंद्र मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयीन अधिक्षक, क्‍लार्क आदींना कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसामध्ये संबंधीतांना सात दिवसामध्ये म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान म्हणणे न मांडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणातील तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्याची शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. ते सध्या मुंबई येथे जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्याकडून कारणे दाखवा नोटीस काढली आहे. याप्रकरणाने तालुक्‍याच्या नव्हे जिल्ह्याच्या शैक्षणीक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पगारप्रकरणी दहा जणांना नोटीसा

बडतर्फ शिक्षीकेचा नियमित पगार काढल्याप्रकरणी दहा जणाना नावे पुढे आली आहेत. यामध्ये काही जणाची पदोन्नती झाल्याने उच्च पदावर सध्या काम करीत आहेत. तर दोघे जण नोकरीतून सेवानिवृत झाले आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने "दै.सकाळ" शी बोलताना दिली. 

Web Title: Kolhapur News debar teacher salary issue