‘कोल्हापुरी चप्पल’चे लेदर पेटंट रजिस्टर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘देशविदेशांत प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलचा दर्जा टिकविण्यासाठी त्याचे पेटंट रजिस्टर केले आहे. चप्पलवर केल्या जाणाऱ्या रासायनिक कोटिंगमुळे ती पावसाळ्यासह सर्व ऋतूंत वापरता येईल. शिवाय विविध रंगांत उपलब्ध होणार आहे. ‘कोल्हापूर’ नावाने पेटंट मिळू शकत नाही; म्हणून ‘सुपरहाड्रोफोबिक लेदर फुटवेअर’ अशा नावाने कोल्हापुरी चप्पलचे पेटंट घेतले आहे,’ अशी माहिती संशोधक दिग्विजय राजेश पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी विभागात दिग्विजय पाटील हा सध्या बी.एस्सी. २ वर्गात शिकत आहे. गेली दोन वर्षे त्याने कोल्हापुरी चप्पलवर संशोधन केले आहे. त्यातून त्याने टिकाऊ आणि दर्जेदार कोल्हापुरी चप्पलसाठी कोटिंग तयार केले आहे. दिग्विजय म्हणाला, ‘‘लेदरमध्ये कोल्हापूर चप्पल जगप्रसिद्ध आहे. त्याला गालबोट लागू नये, कारण बनावट व खोट्या कोल्हापुरी चपलांची आज बाजारात विक्री होत आहे.

चप्पल पावसाळ्यात घातली, तर तिला बुरशी चढते, ती मऊ पडते. नेमके यावरच लक्ष केंद्रित करू, दीड वर्ष अभ्यास केला. त्यानंतर संशोधन केले. त्यानंतर एक रसायन शोधले; ज्यामुळे कोल्हापुरी चप्पलला बुरशी पकडणार नाही. कोणत्याही रंगात ते तयार करता येईल. मूळ रंगालाही रासायनिक कोटिंग करून, आहे तोच रंग ठेवता येतो. भविष्यात इतर चप्पलप्रमाणेच कोल्हापुरी चप्पल मार्केटमध्ये बाराही महिने विक्रीस असेल, ती वापरता येईल. हे संशोधन कोल्हापुरी चप्पलचे आयुष्यमान वाढविणारे आहे. मी स्वतः पावसाळ्यात चिखलात कोटिंग करून चप्पल वापरली आहे. या संशोधनात आई प्रा. डॉ. सौ. ऊर्मिला पाटील, वडील आर. आर. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Web Title: Kolhapur News Digvijay Patil research