‘आपत्ती व्यवस्थापन’ची आज विद्यापीठात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कोल्हापूर - राज्यातील १४  विद्यापीठांतील १२२२ विद्यार्थ्यांच्या आपत्ती  व्यवस्थापन शिबिराची सुरवात उद्या (ता.१) पासून होत आहे. दहा दिवस सुरू राहणार आहे. शिबिराचे उद्‌घाटन दोन जूनला दुपारी चार वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते लोककला केंद्रात होईल. समारोप दहा जूनला होणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदे दिली.

कुलगुरू शिंदे म्हणाले, ‘‘पाच ग्रुपच्या माधमातून विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत. त्यांना नारंगी, पांढरा, हिरवा, निळा आणि जांभळ्या रंगाचे टीशर्ट दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मोबाइल ॲपही तयार केला आहे. विद्यार्थी विद्यापीठाच्या कोणत्याही ठिकाणी असल्यास त्याला ॲप मार्गदर्शन करेल. ॲपवर कोल्हापूरच्या वैशिष्ट्यासह पर्यटनाचीही माहिती दिली आहे. त्यांना डिजिटल ओळखपत्र ही दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यापीठातील वीस मुले आणि दहा मुली आणि त्यांचे दोन प्रशिक्षक आज विद्यापीठात दाखल झाले आहेत. 

उद्या सकाळी नऊपासून त्यांचे प्रात्यक्षिक सुरू होणार आहे. जमिनीवरील आणि पाण्यातील प्रशिक्षण दिले जाणार असून, काही प्रशिक्षण राजाराम तलावात होणार आहे. एन.डी.आर.एफ.चे जवान-अधिकारी या विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापाठीत हजर झाले आहेत.’’

भविष्यात हेच विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य करतील असे सांगून कुलगुरू शिंदे पुढे म्हणाले,‘‘ संपूर्ण शिबिराचे आयोजन राज्यपाल भवनातूनच झाले आहे. त्याची अंमलबजावणी विद्यापीठ करीत आहे. संपूर्ण शिबिरात विद्यार्थ्यांना  वेगवेगळी बक्षिसे देण्याचे नियोजन आहे. बेस्ट विद्यापीठ, बेस्ट स्टुडंड यांची निवड केली जाणार आहे.  समारोपापूर्वी शहरातून आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी रॅलीही काढली जाणार आहे.’’

परिषदेस प्रभारी प्र कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, एन.एस.एस.चे प्रमुख डी.के.गायकवाड, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, प्रा.सुमेधा साळुंखे आदी उपस्थित होते.

Web Title: kolhapur news disaster management camp in university