दुषित पाणी पुरवठा प्रश्नी इचलकंरजीत मोर्चा

पंडित कोंडेकर
सोमवार, 7 मे 2018

इचलकरंजी - इंदिरानगर परिसरात नळाला दुषित पाणी येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून जलवाहिनी बदलण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन देवून बाटलीतून आणलेले दुषित पाणी दिले. याबाबत आवश्‍यक त्या उपाय योजना करण्याचे आश्‍वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी दिले.

येथील इंदिरानगर परिसरातील नळांना दुषित पाणी येत आहे. या परिसरातील सारण गटार तीस वर्षापूर्वी केलेली आहे. पाऊस आल्यानंतर पाणी थेट घरांमध्ये घुसत आहे. याच परिसरात वीस वर्षापूर्वीची जलवाहिनी आहे. गळतीमुळे या जलवाहिनीत गटारीचे पाणी जात आहे. तेच पाणी नळाला येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले. याबाबत पालिकेकडे तक्रार करुन ही कोणतीच कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे बहुजन दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली आज इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्षा स्वामी यांना निवेदन देवून सारण गटार करण्याबरोबरच जूनी जलवाहिनी बदलण्याची मागणी केली. चार दिवसांतून सध्या पाणी येत आहे. त्यातच नळाला दुषित पाणी येत असल्याबद्दल महिलांनी संताप व्यक्त केला. तातडीने सर्व कामे मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नविन जलवाहिनी टाकण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे आश्‍वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी आंदोलकांना दिले. आंदोलनात रावसो निर्मळे, उमेश सांगावकर, प्रशांत बाबर, शिवाजी पोटे, संभाजी त्रिमुखे, शारदा खामकर, शकुंतला रावळ, रेणूका पारसे, इंदिरा सारडा, नंदा कांबळे, संगीता बाबर, लक्ष्मी पाटील, सतिश कांबळे, सुजित पारखे, ज्ञानेश्‍वर केंगार, महेश पाटील यांचा समावेश होता. 

Web Title: Kolhapur News distribution of polluted water issue