कॉमर्स इंग्रजी माध्यमाची गाडी सुसाट

कॉमर्स इंग्रजी माध्यमाची गाडी सुसाट

कोल्हापूर - अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेबरोबर यंदा वाणिज्य इंग्रजी माध्यमाला अच्छे दिन आले आहेत. १ जुलैपासून लागू झालेला जीएसटी त्या अनुषंगाने अर्थकारणातील भविष्यातील संधी, याचा विचार झाल्याने या शाखेला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत पहिल्यांदाच वाढ झाली आहे. विज्ञान शाखेचे प्रवेश यंदा ९२.२० टक्‍क्‍याला (कट ऑफ लिस्ट) बंद झाले. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांत न्यू कॉलेज पहिल्या क्रमांकावर आहे. वाणिज्य इंग्रजी शाखेला विज्ञानपाठोपाठ विद्यार्थ्यांनी पसंती दिली. या माध्यमाचा प्रवेश ८६.२० टक्‍क्‍याला बंद झाला.

दहावीच्या निकालात वाढ झाल्याने अकरावी प्रवेशासाठी रस्सीखेच होईल, असे चित्र होते. मात्र एकाच वेळी आयटीआय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाल्याने अकरावीच्या प्रवेश क्षमतेच्या सुमारे चौदाशे अर्ज कमी दाखल झाले. विज्ञान शाखेला ५९६०, वाणिज्य मराठीसाठी २७१६, कला शाखेसाठी १७७७, इंग्रजी वाणिज्यसाठी १४२४ इतके अर्ज दाखल झाले. शाखानिहाय  प्रवेश क्षमता विज्ञान ५८४०, कला मराठी ३७२०, वाणिज्य मराठी ३०४० तर इंग्रजी माध्यमाची ४२९ इतकी होती. 

केंद्रीय पद्धतीने राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेत विज्ञान शाखेला पाच हजार ८४०, वाणिज्य मराठीला ३३६०, इंग्रजी माध्यमाला १०६०, कला मराठी ३७२० आणि इंग्रजी माध्यमासाठी १२० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला. गुणवत्ता निहाय दुपारी तीनच्या सुमारास महाविद्यालयात झळकली. यादीत आपल्याला स्थान मिळाले की नाही, याची उत्सुकता विद्यार्थ्यांत होती. विविध महाविद्यालयांत यादी पाहण्यासाठी गर्दी झाली. तत्पूर्वी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी, कार्याध्यक्ष प्राचार्य नागेश नलवडे यांनी पत्रकार परिषदेत निवड यादीची माहिती दिली.

विज्ञान शाखेच्या यादीत गतवर्षापेक्षा अर्ध्या टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. सध्या जीएसटी लागू झाल्याने भविष्यात अर्थकारणाला अच्छे दिन येणार, हे पाहून वाणिज्य इंग्रजी शाखेला प्रवेश घेणाऱ्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ८६० प्रवेश क्षमतेसाठी १४४१ इतके अर्ज दाखल झाले. ६०२ विद्यार्थ्यांचे जादाचे अर्ज आले. त्यांच्या प्रवेशासाठी डी. डी. शिंदे व विवेकानंद महाविद्यालयाला दोन जादा तुकड्या द्याव्या लागल्या. वाणिज्य मराठी शाखेचा कल कमी झाला आहे. कला शाखेलाही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांना येत्या चार दिवसांत प्रवेश निश्‍चित करावा लागेल. २२ ते २४ जुलैअखेर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. २५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील, असे प्रयत्न आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधी तक्रारी आहेत. त्यांनी कला शाखेसाठी (कमला कॉलेज), वाणिज्यसाठी (कॉमर्स कॉलेज), विज्ञान शाखेसाठी विवेकानंद महाविद्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत संपर्क साधावा. हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. अंतर दूर आहे, शाखा बदलून हवी, अशा तक्रारींचा विचार केला जाणार नसल्याचे केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.

पुढील वर्षापासून ऑनलाईन प्रवेश
राज्यात कोल्हापूर आणि लातूर दोनच शहरे ऑनलाईन प्रवेशापासून दूर आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून केंद्रीय प्रवेश पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. शहरात गेल्या सात वर्षांपासून केंद्रीय पद्धत सुरू झाली.

 कट ऑफ लिस्ट- विज्ञान शाखा
न्यू कॉलेज- ९२.२०, राजाराम महाविद्यालय- ९०.८०, विवेकानंद महाविद्यालय-९०., स. म. लोहिया- ८८.६०. महाराष्ट्र हायस्कूल-८७.६०, न्यू कॉलेज-८५.६०, विवेकानंद-८४.८०, स. म. लोहिया-८२.४०, गोखले कॉलेज-८२.२०, मेन राजाराम-८४.६०, शाहू महाराज हायस्कूल-७९.८०, शाहू कॉलेज-७५.६०, पद्माराजे- ८३.८०, कमला कॉलेज-८४.००. विद्यापीठ हायस्कूल-८०.६०

वाणिज्य (मराठी) 
न्यू कॉलेज- ८१.८०, कमला कॉलेज- ७७.४०, महाराष्ट्र हायस्कूल-७५.६०, विवेकानंद-७५.२०, कॉमर्स कॉलेज ७४.८०, मेन राजाराम-७१.८०, प्रिन्सेस पद्‌माराजे-७०.२०, विद्यापीठ ज्युनिअर-६५.४०, महावीर महाविद्यालय-६१.०० शाहू कॉलेज-५५.६०, गोखले कॉलेज-५८.४०, 

कला मराठी 
न्यू कॉलेज-७०.६०, स. म. लोहिया-६४.००, राजाराम महाविद्यालय-६३.६० नेहरू हायस्कूल-५७.२०, म. ल. ग.-४४, केएमसी-३८.२०. शहाजी महाविद्यालय-३७.००, कमला कॉलेज-३८, शाहू कॉलेज-३७.६०, शाहू महाराज हायस्कूल-४४.२०,  तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर-४१.६०, गोखले कॉलेज-३६.००, 

वाणिज्य (इंग्रजी)
कॉमर्स कॉलेज-८६.२०, विवेकानंद-८०.८०, डी. डी. शिंदे-७६.२०, 
न्यू मॉडेल-७२.८०, 
कमला कॉलेज-७१.८०, 
डी. वाय. पाटील-६८.०० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com