हत्तींचा कळप वेळवट्टीत; टस्कर वझरेकडे 

रणजित कालेकर
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

आजरा - आठ दिवसांपूर्वी तालुक्‍यात दाखल झालेला हत्तींचा कळप वेळवट्टी परिसरात तळ ठोकून आहे. गेले दीड वर्ष या परिसरात वावरत असलेल्या टस्कर हत्तीने हा परिसर सोडला असून तो वझरेकडे गेल्याचे वन विभागातून सांगण्यात आले.

आजरा - आठ दिवसांपूर्वी तालुक्‍यात दाखल झालेला हत्तींचा कळप वेळवट्टी परिसरात तळ ठोकून आहे. गेले दीड वर्ष या परिसरात वावरत असलेल्या टस्कर हत्तीने हा परिसर सोडला असून तो वझरेकडे गेल्याचे वन विभागातून सांगण्यात आले.

हा कळप मेसकाठीचे कोंब फस्त करत असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कळपाला या परिसरातून हुसकावून लावण्याचे वन विभागाचे प्रयत्न असफल ठरले असून त्याच्यावर पाळत ठेवण्याचे काम वन विभागाचे पथक करत आहे. 

लाटगाव, एरंडोळ परिसरांत असलेला कळप चार दिवसांपूर्वी वेळवट्टी परिसरात दाखल झाला. या कळपामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कळप मेसकाठीचे कोंब फस्त करत आहे. कळपात तीन हत्ती व दोन पिल्ले आहेत. या परिसरात असलेला टस्कर हत्ती वझरेकडे गेला आहे.

काल (ता. 17) रात्री आजरा-आंबोली रस्त्यावर वेळवट्टीजवळील तेजम यांच्या शेतातील मेसकाठीचे कळपाने नुकसान केले. शंभर मेसकाठीचे कोंब या कळपाने फस्त केले. वन विभागाचे पथक येथे आले. त्यांनी हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण हत्ती बधले नाहीत. 

भरपाई कधी? 
बांबूचे पीक हे गवतवर्गीय असल्याचा जीआर असल्याने या पिकाला नुकसानभरपाई मिळत नाही. याला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वन विभागाने प्रस्ताव दिला आहे. याबाबत अजूनही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे भरपाई कधी मिळणार, अशी विचारणा शेतकऱ्यांतून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Elephant in Ajara Taluka

टॅग्स