कोल्हापूर जिल्ह्याला २७५ कोटींचा लाभ शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

राज्य सरकारची कर्जमाफी - ३ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार फायदा कोल्हापूर - सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्याचे दीड लाखापर्यंत पीक कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांचे मध्यम-मुदतीतील थकीत कर्जही पात्र ठरणार असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. २०१६ अखेर थकीत असणाऱ्या आणि निकषास पात्र ठरणाऱ्या कर्जदारांना सुमारे २२५ कोटी रुपयांचा लाभ सरकारच्या या निर्णयामुळे होणार आहे.

राज्य सरकारची कर्जमाफी - ३ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार फायदा कोल्हापूर - सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्याचे दीड लाखापर्यंत पीक कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांचे मध्यम-मुदतीतील थकीत कर्जही पात्र ठरणार असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. २०१६ अखेर थकीत असणाऱ्या आणि निकषास पात्र ठरणाऱ्या कर्जदारांना सुमारे २२५ कोटी रुपयांचा लाभ सरकारच्या या निर्णयामुळे होणार आहे. तर सुमारे ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केल्याने यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ५० कोटींचे अनुदान मिळण्याची शक्‍यता आहे.  

जिल्ह्यात ३० जून २०१६ अखेर ५३ हजार शेतकरी थकीत आहेत. यामध्ये मध्यम मुदत कर्ज असणाऱ्या थकीत कर्जदारांचा आकडा वाढणार आहे. सरकारने पूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याची टीका राज्यभर होऊ लागली होती. या कर्जमाफीतील निकषांचा विचार करता लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. त्यामुळे केवळ अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी होऊ लागली. १ जूनपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी फडणवीस सरकारने अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. परंतु हे करत असताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि इतर ३४ बॅंका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. त्यापैकी मध्यवर्ती बॅंकेचा विचार केला तरी ३ लाख ७८ हजार ३०५ शेतकऱ्यांपैकी केवऴ ५३ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामध्ये इतर शेतकऱ्यांचा समावेश नाही.

दरम्यान, यामध्ये ५ हजार ८२ शेतकऱ्यांनी दीड लाख ते साडेपाच लाखांपर्यंतचे कर्ज घेतले आहे. या शेतकऱ्यांनाही सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. दरम्यान, नियम आणि निकषामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीला मुकावे लागणार आहे.

Web Title: kolhapur news farmer loanwaiver 275 crore