मुदतीत माहिती न दिल्याने अतिग्रे ग्रामसेवकास दंड

गणेश शिंदे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जयसिंगपूर - माहिती अधिकाराखाली मुदतीत माहिती न दिल्यामुळे अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील ग्रामसेवक एस. एस. कांबळे यांना राज्य माहिती आयुक्तांनी (पुणे) तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश हातकणंगले पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.

जयसिंगपूर - माहिती अधिकाराखाली मुदतीत माहिती न दिल्यामुळे अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील ग्रामसेवक एस. एस. कांबळे यांना राज्य माहिती आयुक्तांनी (पुणे) तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश हातकणंगले पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. याबाबत रामचंद्र खोपाण्णा कांबळे (रा. नवीन न्यायालयाजवळ, जयसिंगपूर) यांनी तक्रार केली होती. 

रामचंद्र कांबळे यांनी माहिती अधिकाराखाली 11 फेब्रुवारी 2016 रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील अश्‍विनी कांबळे उर्फ वर्धन यांच्या मिळकतीचे उतारे मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामसेवकांनी माहिती देणे न्यायोचित असताना ती न मिळाल्याने रामचंद्र कांबळे यांनी हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे प्रथम अपिल केले होते. अपिलाच्या सुनावणीवेळी 6 मे 2016 रोजी ग्रामसेवकाने कांबळे यांना माहिती दिली होती. रामचंद्र कांबळे यांनी मुदतीत माहिती मिळाली नसल्याने ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी राज्य माहिती अधिकारी पुणे खंडपीठ यांच्याकडे केली होती. अपील गुणदोषावर चालून 22 नोव्हेंबर 2017 रोजी ग्रामसेवक श्री. कांबळे यांना तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रामचंद्र कांबळे यांना ऍड. इंद्रजीत कांबळे, ऍड. इ. जी. नदाफ, ऍड. एस. एस. म्हाळुंगेकर, ऍड. ए. बी. पवार यांचे कायदेशीर सहाय्य मिळाले. 

Web Title: Kolhapur News Fine to Gramsevak