कोल्हापूर हरवले दाट धुक्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - गेल्या दोन तीन दिवसापासून शहर व जिल्ह्यात हलक्या प्रमाणात असणारे धुके आज (सोमवारी) सकाळी गडद झाले. सोमवारची पहाट दाट धुक्यानीच उजाडली. सकाळी नऊपर्यंत बहुतांशी ठिकाणी सूर्यदर्शन झालेलेच नाही. 

ऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरल्याने याचा परिमाण रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ज्या पिकांची वाढ पूर्ण झाली आहे त्यांना धोका नसला तरी जी पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत त्या पिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. धुक्याचे थेंब ज्वारीची कोवळी कणसे यावर साठून राहिल्याने हुरड्याच्या अवस्थेतील कणसे काळी पडू शकतात. जिल्ह्यातील हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत येत असल्याने धुक्याचा हरभऱ्यावर फारसा परिणाम होणार नाही असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान दिवसभराच्या उष्णतेनानंतर धुके पडत असल्याने हे धुके आरोग्याच्या दृष्टीने फारसे हितावह नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: Kolhapur News Fog in district