कोल्हापूरचा फुटबॉल पंच सुनील पोवारची मुलूखगिरी...

संदीप खांडेकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - खेळाडू कोणीही असो अथवा संघ कोणताही असो, त्याच्या विरोधात निर्णय देताना हा पंच कधीच डगमगत नाही. खेळाडूने मैदानात अरेरावीची भाषा वापरली, तरीसुद्धा तो त्याला जुमानत नाही. नियम म्हणजे नियम, या तत्त्वाने हा पंचगिरी करत असल्याने त्याची ‘मुलूखगिरी’ राज्यात सुरू आहे. पंचगिरी हे ‘प्रोफेशन’ कसे होऊ शकते, याचा दाखला तो देत असून, सुमारे साडेचार हजारांहून अधिक सामन्यांसाठी त्याने पंचगिरी केली आहे. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात राहणारा हा पंच म्हणजे सुनील मधुकर पोवार. 

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाचा तो वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. दिलबहार तालीम मंडळ (अ) व (ब), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, झुंजार क्‍लब, साईनाथ स्पोर्टस, शिवनेरी स्पोर्टस अशा वेगवेगळ्या संघांतून तो खेळला आहे. कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वीपासून तो पंच म्हणून कार्यरत झाला. एक ‘कडक’ पंच म्हणून त्याची ओळख आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर होणाऱ्या वरिष्ठ गट साखळी सामन्यांपासून ते हंगामातील प्रत्येक स्पर्धेत तो पंचगिरी करत आला आहे. संघ कोणताही असो, त्याचे समर्थक व खेळाडू कितीही आक्रमक असोत अथवा सामना कितीही संवेदनशील असो, त्या सामन्यात नियमाला धरून निर्णय देणे, याला तो महत्त्व देतो. त्यामुळेच तो नेहमी चर्चेत राहत आला आहे.

विशेष म्हणजे छत्रपती शाहू स्टेडियमसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, मिरज, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, बेळगाव, नवी मुंबई, गडहिंग्लज येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धांतही पंचगिरी केली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा), डीएसके, रिलायन्स फाऊंडेशन, सोळा वर्षांखालील आय लीग, अठरा  वर्षांखालील आय लीग स्पर्धेतील सामन्यात त्याने आपल्या उत्कृष्ट पंचगिरीची प्रचीती दिली आहे. 

कोल्हापुरात होणाऱ्या शालेय फुटबॉल स्पर्धांतही तो पंच म्हणून काम करतो. यंदा सुरू असलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेतसुद्धा तो पंच म्हणून कामगिरी करत आहे. तो म्हणतो, ‘‘पंच हे एक ‘प्रोफेशन’ असून, त्यातून चांगली कमाई करता येते. पंचगिरीच्या निमित्ताने सेलिब्रेटींना भेटण्याची संधीही मिळते आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूुलकर, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, नीता अंबानी यांच्याशी हस्तांदोलनाची संधी मला मिळाली आहे. नोकरी नाही म्हणून रडण्यापेक्षा पंचगिरीकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. मी आता राष्ट्रीय पंच परीक्षेची तयारी करत असून, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला राष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करण्याची संधी मिळेल. तूर्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

* कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन 
 अध्यक्ष - श्रीनिवास जाधव
 उपाध्यक्ष- नंदकुमार सूर्यवंशी
 सचिव - प्रदीप साळोखे  
 खजिनदार - राजेंद्र राऊत
 रेफ्री असोसिएशनकडील नोंदणीकृत पंच - २२ 

 गटनिहाय सामने  
वरिष्ठ गट साखळी - ५६ 
ब - ३६
क - ३६
ड - ३०
इ - ७५
गडहिंग्लज साखळी सामने - ४०
 करवीरचे - १८ 
 विविध स्पर्धांमधील सामने - ६०

Web Title: kolhapur news football sunil powar