फौंड्री उद्योग विस्ताराच्या तुलनेत रोजगार निर्मितीचा वेग मंद

अभिजित कुलकर्णी
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नागाव - कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाची क्षमता ज्या वेगाने विस्तारत आहे, त्या तुलनेत रोजगार निर्मितीचा वेग मात्र मंदावला आहे. ऑटोमायझेशनशिवाय उद्योगाचा विस्तार शक्‍य नसला तरी वाढत्या बेरोजगारीचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राची विभागणी ही प्रामुख्याने साखर कारखाना, फौंड्री उद्योग आणि इचलकरंजीत विस्तारलेली सूत गिरणी अशा तीन टप्प्यांत होते. साखर कारखाने हे थेट शेतीशी निगडित असल्याने तेथे बहुतांश रोजगार हा हंगामीच आहे. त्यामुळे नियमित रोजगार निर्मितीमध्ये फौंड्री उद्योगच आघाडीवर आहे.

जिल्ह्यातील स्थिती

 •  शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, इचलकरंजी, हातकणंगले परिसरात असलेल्या फौंड्री : ३०० 
 •  ऑटोमोबाईल, ऑईल इंजिनशी निगडित : ४२ टक्के
 •  पंप आणि वॉल्व्हशी निगडित : १७ टक्के 
 •  साखर कारखान्याशी निगडित : ६ टक्के 
 • ट्रॅक्‍टर आणि शेती औजारांशी निगडित : ४ टक्के 
 • इतर प्रकारच्या कास्टिंगशी निगडित : ३१ टक्के

कास्टिंग निर्मिती क्षमता 

 •  २०१२ ला असलेले कामगार : ४० हजार 
 •  एकूण उत्पादन क्षमता : महिन्याला ४० हजार टन
 •  सूत्र : १ टन कास्टिंग निर्माण करण्यासाठी सरासरी १ कामगार
 • सध्या 
 •  कामगारांची संख्या : ४५ हजार
 •  उत्पादन : ४० हजार टनापासून ७५ हजार टनापर्यंत
 •  सूत्र : दीड टन कास्टिंग निर्माण करण्यासाठी सरासरी १ कामगार 

भविष्यात काय?
 बदलते तंत्रज्ञान आणि फौंड्री उद्योगाच्या वाढीचा वेग पाहिला तर भविष्यात सरासरी २ टन कास्टिंग निर्माण करण्यासाठी १ कामगार असे सूत्र तयार होईल. 

मुख्य समस्या
फौंड्री उद्योगाला लागणाऱ्या मनुष्यबळामध्ये हार्ड वर्क करण्यासाठी सध्या स्थानिक आणि कुशल कामगार मिळत नाहीत. यामध्ये कोअर मेकिंग, मोल्डिंग, पोअरिंग, शॉट ब्लास्टिंग, फेटलिंग आणि हमाल हे प्रमुख घटक आहेत. स्थानिक कामगारांना कष्टाचे काम नको असल्याने या सर्व ठिकाणी आता उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालचे तरुण मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. परंतु, तेथील राज्य सरकारचे उद्योगाविषयीचे धोरण बदलत असल्याने या परप्रांतीय कामगारांनाही तेथेच रोजगार मिळू लागला आहे. 

उपाय काय?
 ऑटोमायझेशनशिवाय पर्याय नाही हेच खरे. 

फौंड्री उद्योगाला हार्ड वर्किंग आहे. फेटलिंगसारख्या विभागात कामगारच मिळत नसल्याने उद्योजकांना ऑटोमायझेशनमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. कामगार मिळत नाहीत म्हणून उद्योग थांबणार नाही. आणि क्षमता वाढवायची असेल तर ऑटोमायझेशनशिवाय पर्याय नाही.
- नीरज झंवर,
कार्यकारी संचालक, झंवर उद्योग समूह

‘स्मॅक’ने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण सुरू केले; मात्र येथे तयार होणारे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर औद्योगिक क्षेत्रात काम करण्याऐवजी सेवा क्षेत्राला प्राधान्य देत आहेत. सुशिक्षित तरुण बेरोजगार राहायला तयार आहे; मात्र त्याला हात काळे होणाऱ्या फौंड्री उद्योगात काम करण्याची इच्छा नाही. 
- टी. एस. घाटगे,
सचिव, स्मॅक.

Web Title: Kolhapur News foundry industry Sakal Exclusive