फेसबुकद्वारे मैत्री करत कोल्हापुरातील तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नांदगाव - कोल्हापूर येथे राहणाऱ्या तरुणीशी फेसबुकद्वारे मैत्री करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुरूड पोलिसांनी नगर येथून अटक केली आहे.

नांदगाव - कोल्हापूर येथे राहणाऱ्या तरुणीशी फेसबुकद्वारे मैत्री करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुरूड पोलिसांनी नगर येथून अटक केली आहे.

आरोपीने फेसबुकद्वारे या तरुणीशी ओळख केली होती. त्यानंतर व्हॉटस्‌ॲपद्वारे दोघांमध्ये संभाषण होऊ लागले. अशा प्रकारे मैत्री वाढवून त्याने तिचा विश्‍वास संपादन केला, तिला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले होते. त्या वेळी त्याने तरुणीवर अत्याचार केला. या तरुणीने मुरूड पोलिसांकडे २६ जूनला तक्रार नोंदवली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गोडसे याप्रकरणी तपास करत होते. तपासादरम्यान संशयित रवींद्र कोलपे याला नगर जिल्ह्यातून अटक केली. त्याने पीडित तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत काशिदला आणले होते. येथील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता. संशयिताविरुद्ध ठोस पुरावे पोलिसांनी गोळा केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी दिली.

Web Title: kolhapur news Friendship through Facebook Girl cheated