बाप्पांच्या उत्सवाला सृजनशीलतेची झालर...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवात तरुणाईचा नवीन ट्रेंडवर भर राहणार असून पाटपूजन-पाद्यपूजन सोहळ्याने त्याची चाहूल लागली आहे. केवळ देखावेच नव्हे तर देखाव्याच्या कन्सेप्टनुसार मूर्तीचे डिझाईन आणि इकोफ्रेंडली सजावटीवर यंदा भर असेल. व्हिडिओ इफेक्‍टस्‌, एटीडींग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अशा सृजनशील करियरला यानिमित्ताने चालना मिळणार आहे. 

कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवात तरुणाईचा नवीन ट्रेंडवर भर राहणार असून पाटपूजन-पाद्यपूजन सोहळ्याने त्याची चाहूल लागली आहे. केवळ देखावेच नव्हे तर देखाव्याच्या कन्सेप्टनुसार मूर्तीचे डिझाईन आणि इकोफ्रेंडली सजावटीवर यंदा भर असेल. व्हिडिओ इफेक्‍टस्‌, एटीडींग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अशा सृजनशील करियरला यानिमित्ताने चालना मिळणार आहे. 

दरम्यान, ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर यंदा मूर्तीच्या किंमतीत किमान पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. प्लास्टर व वाहतूकीवर किमान दहा टक्के आणि रंगावर तीन ते चार टक्के ‘जीएसटी’ बसणार आहे. मुंबई-पुण्यातील उत्सवांना महिनाभर अगोदरच प्रारंभ होतो. पाटपूजन सोहळे, पाद्यपूजन सोहळे, आगमन सोहळे साजरे करताना त्यातही वैविध्य आणण्याचा प्रयत्न असतो. या सोहळ्यांचे चित्रीकरण करून त्याचे चांगले एडीटींग  करायचं आणि हे सारं झालं की सोशल मीडियावर ते अपलोड करून मंडळ अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचेल, यासाठी प्रयत्न केले जातात. हा ट्रेंड आता येथील तरूणाई पुढे आणते आहे. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या मोठ्या मूर्तींना दररोज नवीन सोवळं नेसवलं जाते. हा ट्रेंड यंदा काही ठिकाणी घरगुती छोट्या मूर्तींसाठी पुढे आला आहे. 

डिजीटल फलकांना फाटा देत तीन वर्षांपासून हॅंडमेड सजावटीवर मंडळांनी भर दिला आणि दोन वर्षांपासून कन्सेप्टनुसार उत्सव साजरा करण्याचा नवा ट्रेंड पुढे आला. मंडळांनी केवळ मंडप घालून द्यायचा. बाकी देखाव्याची उभारणी, त्याला पूरक मूर्तीचे डिझाईन, देखावा पाहण्यासाठीच्या विविध पध्दती, ऑडिओ-व्हिडिओ इफेक्‍टस्‌, शॉर्टफिल्म किंवा डॉक्‍युमेंटरी करणाऱ्या तरूणाईच्या वीसहून अधिक टीम्स सद्या कार्यरत आहेत. 

या टीम कन्सेप्टनुसार तयार केलेले प्रेझेंटेशन मंडळांना अगोदरच दाखवतात आणि त्याची पॅकेजीस ठरवली जातात. यंदा ही पॅकेजीस सव्वा लाखापासून पुढे आहेत. हॅन्डमेड सजावटीचे दर कन्सेप्ट आणि मंडळांच्या बजेटनुसार ठरतात. प्रति चौरसफूट दीडशे रूपयांपासून पुढे या सजावटीचा दर यंदाही राहणार आहे.

दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार
नव्या ट्रेंडमुळे कलाशिक्षण घेणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आर्थिक उत्पन्नासाठी गणेशोत्सव मोठा आधार ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थी किमान दहा ते पंचवीस हजार रुपये उत्सव काळात मिळवेल आणि त्यातून त्याचा पुढील वर्षभराचा शैक्षणिक खर्च भागेल.

Web Title: kolhapur news ganeshotsav