रेकॉर्डिंग कामाचे नारळ फुटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शेतकरी आत्महत्या, बाहुबली, मराठा समाजाचे मूकमोर्चे, अशा विविध विषयांवर यंदा सजीव देखावे रंगणार आहेत. गणेशोत्सव आता एकवीस दिवसांवर येऊन ठेपला असून, उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. 

सजीव देखाव्यांसाठीच्या रेकॉर्डिंगच्या कामाचे नारळही आता स्टुडिओमध्ये फुटले असून, मंडळांच्या कार्यकर्त्यांची स्टुडिओमधील वर्दळ वाढू लागली आहे. उत्सवातून प्रबोधनाची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. उत्सवातील देखाव्यांना वर्तमानातील सामाजिक प्रश्‍नांची झालर लाभणार आहे. 

येथील गणेशोत्सव आणि देखाव्यांची देदीप्यमान परंपरा हे एक समीकरणच आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा परिसर, कसबा बावड्यात सजीव देखाव्यांची, तर शिवाजी उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आदी भागांना तांत्रिक देखाव्यांची परंपरा आहे. सोमवार, शुक्रवार, शनिवार, जुना बुधवार या पेठांना, तर गेल्या काही वर्षांत प्रबोधनाच्या पेठा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अर्थात यंदाही ही परंपरा नक्कीच जपली जाणार आहे. सजीव देखाव्यांचा विचार केला, तर ऐतिहासिक, प्रबोधनपर देखावे असले तरी विनोदी देखाव्यांचा बाजही नेहमीच वेगळा राहिला आहे.

शहरातील देखाव्यांनी महापालिकेतील कारभारावर सतत भाष्य केले आहे. त्यातून शहरातील विविध प्रश्‍नांचा वेध घेतला गेला. केवळ शहराचाच नव्हे, तर ‘लोकल टू ग्लोबल’ या विषयावर सजीव आणि तांत्रिक देखाव्यांतूनही लोकजागर मांडला गेला आहे. यंदा ही परंपरा कायम राहणार असून, वाहतूक पोलिसांचे विविध प्रश्‍न, पिण्याचे पाणी, शिवाजी पूल असे विविध विषय देखाव्यांच्या माध्यमातून लोकांसमोर यंदाही येणार आहेत.

Web Title: kolhapur news ganeshotsav recording work start