गोकुळ व्यवस्थापनाच्यावतीने निषेध, जनजागृती मार्चा

राजकुमार चौगुले
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कोल्हापूर - जिल्हा दूध संघाची (गोकुळ) बदनामी होत
असल्याच्या निषेधार्त गोकुळ व्यवस्थापनाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध व जनजागृती मार्चा काढण्यात आला. शासनाने दुधासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी असली तरी पडद्यामागून मात्र आमदार सतेज
पाटील यांच्या विरोधात शक्ती प्रदर्शन या निमित्ताने करण्यात आले.

या मोर्चासाठी प्रत्येक गावांतून हजारो पुरुष व महिला सभासद उपस्थित होते. गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गोकुळवर मोर्चा काढून गोकुळच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. याला शह देण्यासाठी गोकुळचे संचालक व व्यवस्थापनाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. वैयक्तीक स्वार्थासाठी गोकुळची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी बहुतांशी वक्‍त्यांनी दिला.

दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चास सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मोचोचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष विश्‍वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, पी.एन. पाटील. आमदार सुरेश
हळवणकर आदी उपस्थित होते.

गोकुळने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ख्याती पोचवली. या दूध संघावर साडेपाच लाख कुटुंबे अवलंबून आहेत. सुमारे बत्तीस योजनांद्वारे दूध उत्पादकांची सेवा या संघामार्फत करण्यात येते, असे असतानाही काही व्यक्ती मुद्दामहून या संघाच्या व्यवस्थापनाबाबत गैरसमज पसरवून संघाची बदनामी करीत आहेत.

अनेक लोकांचा उदरनिर्वांह अवलंबून असणाऱ्या या संघाच्या कारभारावर शंका व्यक्त करीत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी श्री. महाडिक यांच्यासह विविध वक्‍यांनी नमूद केले.

Web Title: Kolhapur News Gokul issue