भुदरगड तालुक्‍यात सात सरपंच बिनविरोध

धनाजी आरडे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

गारगोटी - भुदरगड तालुक्‍यातील ४४ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली; तर सात गावांच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. याउलट मडिलगे खुर्द, देवकेवाडी ग्रामपंचायतीत सदस्यांची निवड बिनविरोध झाली. मात्र, सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.  

तालुक्‍यातील १८ ग्रामपंचायतींच्या १४६ सदस्यांपैकी ७४ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. निवड झालेल्या सदस्यांची गावनिहाय संख्या अशी : सोनारवाडी (८), मडिलगे खुर्द (९), कूर (२), टिक्केवाडी (१), दारवाड (१), भाटिवडे (१), मिणचे बुद्रुक (६), देवकेवाडी (७), पारदेवाडी (५), मडूर (१), अंतिवडे (६), कारिवडे (२), अनफ खुर्द (५), अंतुर्ली (४), वेंगरूळ (१), देऊळवाडी (३), पाल (४), दिंडेवाडी (८). 

अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीला प्राधान्य दिल्याने बहुतांश जागा बिनविरोध झाल्या; तर काहींनी बिनविरोधला बगल देत थेट निवडणुकीला प्राधान्य दिले. यामुळे काही गावांत चुरशीचा सामना रंगला आहे. 

सरपंचपदासाठी निवडणूक 
तालुक्‍यातील शासनाच्या अनेक पुरस्कारप्राप्त मडिलगे खुर्द गावाने सलग चार वेळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. या वेळीही बिनविरोध निवडीच्या हालचाली झाल्या. मात्र, केवळ सदस्य निवडीत पदाधिकाऱ्यांना यश आले. सरपंचपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने हा तिढा सुटला नाही. येथे गौरी बाबूराव खापरे विरुद्ध कविता कृष्णात मांडे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दिंडेवाडी येथेही सरपंचपदासह एका सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election