भावकीच्या राजकारणाचा बसेना मेळ

गणेश शिंदे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जयसिंगपूर -  शिरोळ तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भावकी आणि गावकीचा अंदाज उमेदवारांना येत नसल्याने पायाला भिंगरी लावून उमेदवार आणि त्यांचे समर्थक गल्लीबोळ पिंजून काढत आहेत. सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा कस लागला असून, विशेष अधिकारांमुळे सरपंचपदाची निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. 

चिंचवाड ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुकीने आदर्श निर्माण केला आहे. याआधीही दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्‍यातील पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तिरंगी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापूर, टाकवडे, हेरवाड, कनवाड, संभाजीपूर, खिद्रापूर, नवे दानवाड, शिवनाकवाडी, अकिवाट, औरवाड, कवठेसार, उमळवाड, हरोली, राजापूरवाडी या गावांच्या निवडणुकांमध्ये सध्या प्रचंड चुरस आहे. सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली असून, अनेक उमेदवारांनी नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. चौदा गावांच्या सरपंचपदासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी तयारी केली आहे. गावची निवडणूक असली तरी तालुक्‍याच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्ते रिचार्ज झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत.  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळालेल्या नेत्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून यशाची मालिका अखंड राखायची असल्याने अनुकूल असणाऱ्या गावांमध्ये नेत्यांनी तळ ठोकला आहे; मात्र विविध ग्रामपंचायतींच्या प्रचाराच्या धुरा सांभाळताना नेत्यांची चांगलीच कसरत होत आहे. पक्ष, संघटनांनी जरी गावामध्ये फिल्डिंग लावली असली तरी कार्यकर्त्यांनी सोयीच्या भूमिकाही घेतल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election