कोल्हापूरात आत्तापर्यंत अनेक ठिकाणी 40 टक्क्यांच्यावर मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यात 439 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साड़े सात ला मतदानाला सुरुवात झाली. सकाळ पासूनच लोकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. 

पाचगाव, गांधीनगर, उचगाव याठिकाणी सकाळी 9.30 पर्यन्त 10 ते 15 टक्के मतदान झाले आहे. लोक उत्साहाने मतदान करत आहेत. मतदानासाठी महिला व मुलींनी गर्दी केली आहे. आतापर्यन्त सर्वच केंद्रावर शांततेत मतदान झाले आहे.

कापणी, मळणी आदी शेतीची कामे सुरू असल्याने सकाळीच मतदानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. आणूर ( ता. कागल) येथे आत्तापर्यंत 45 टक्के मतदान झाले आहे. पिराचीवाडी येथे 47 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. राधानगरी तालुक्यात शांततेत मतदान सुरू असून 40 ते 42 टक्के मतदान झाले आहे. गडहिंग्लज तालुक्यात 34. 45 टक्के तर भुदरगड तालुक्यात 37 ग्रामपंचायतीसाठी   आत्तापर्यंत 45 ते 52 टक्के मतदान झाले आहे. मुदाळ  येथे माजी आमदार के. पी. पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election