भुदरगड तालुक्यात सरपंच निवडणूकीत स्थानिक आघाड्यांची मुसंडी

धनाजी आरडे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

गारगोटी -  भुदरगड तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 24 ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी जोरदार मुसंडी मारली. तर आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव गटाने 6, माजी आमदार के. पी. पाटील 5, भाजपने एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यश मिळविले. 

गारगोटी -  भुदरगड तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 24 ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी जोरदार मुसंडी मारली. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार दिनकरराव जाधव गटाने 6, माजी आमदार के. पी. पाटील 5, भाजपने एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यश मिळविले. 

तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. यातील 8 ग्रामपंचायती व 7 सरपंच पदाच्या निवडी बिनविरोध निवडी झाल्या. माजी आमदार के पी पाटील यांनी मुदाळ, बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई यांनी कडगाव, माजी सभापती विश्वनाथ कुंभार यांनी पिंपळगाव, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, बी. एस. देसाई यांनी कूर व माजी सभापती नंदकुमार ढेंगे-बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले यांनी मडिलगे बुद्रुक या प्रमुख गावात आपली सत्ता कायम राखली. तर पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, माजी संचालक सुनीलराव कांबळे, बिद्रीचे संचालक के. ना. पाटील यांना संमिश्र यशावर समाधान मानावे लागले.

पक्षीय झेंड्यापेक्षा गावपातळीवर स्थानिक आघाड्यांना लोकांनी पसंती दर्शविली. सर्वच गावात आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाडीवरच भर दिला होता.

तालुक्यातील विजयी सरंपच उमेदवार  -

विश्वनाथ यशवंत कुंभार (पिंपळगाव), शीतल संजय माने (मुदाळ), शुभांगी प्रकाश शिंदे (मडिलगे बुद्रुक), जयश्री दिलीप कुरडे (वाघापूर), सुरेश नाईक (शेणगाव), सुहासिनी विजयकुमार भांदिगरे (आकुर्डे), राजाराम बापू तथा आर. बी. देसाई (पुष्पनगर), मधुरा समाधान खटांगळे (व्हनगुती), गौरी बाबूराव खापरे (मडिलगे खुर्द), श्रीकांत मारुती कांबळे (आंतिवडे), ज्ञानदेव सिताराम देसाई (कारिवडे), आक्काताई जयवंत देवेकर (आरळगुंडी), सुचिता सुरेश राणे (सोनारवाडी), प्रशांत संभाजी देसाई (शेळोली), मनीषा अभिजीत देसाई (भाटिवडे), पांडुरंग तुकाराम देसाई (हेदवडे), श्रीधर मारुती भोईटे (दिंडेवाडी), साताप्पा शामराव निकाडे (महालवाडी), कल्पना मोहन पाटील (टिक्केवाडी), सचिन बाबूराव गुरव (मिणचे बुदुक), नारायण गणपती वरपे (वरपेवाडी), कल्पना विठ्ठल कांबळे (देऊळवाडी), मनोज आनंदा चव्हाण (वेसर्डे), हरी गुंडू गुरव (पडखंबे), राणी समाधान पाटील (कोनवडे), उदयसिंह मारुती देसाई (पाचवडे), माधुरी संजय कुंभार (देवकेवाडी), रंजना सदाशिव बेलेकर (करडवाडी), सुरेश पांडुरंग कुंभार (दारवाड), सुहासिनी सागर पाटील (मडूर), प्रियांका तुकाराम जाधव (अंतुर्ली), नामदेव कृष्णा उर्फ एन. के. देसाई (वेंगरूळ), संभाजी हिंदूराव नलगे (मानवळे),अनिल मारुती हळदकर (कूर), दीपक भिमराव कांबळे (कडगाव), सोनाबाई मारुती यादव (पाल).

बिनविरोध निवड झालेले सरपंच असे - 
पूजा सात्ताप्पा गुरव (कोळवण पाळेवाडी), पाडुरंग बाळू निकाडे (पारदेवाडी), लताबाई दीपक कदम (राणेवाडी), कुंडलिक रामचंद्र सुतार (तिरवडे), सालू जोसेफे डिसोझा (तांबाळे), सखाराम सोनबा कोटकर (देवर्डे), नंदा मधुकर पोवार (न्हाव्याचीवाडी).

माजी उपसभापती बनले सरपंच

पिंपळगाव ग्रामपंचायतीत माजी उपसभापती व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कुंभार यांनी विरोधी आघाडीचा धुव्वा उडविला. ते सर्व आघाडीसह स्वत: उच्चांकी मतांनी विजयी झाले. या मुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

विजयाचा जल्लोष

गारगोटीत मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुलात मत मोजणी झाली. फेरीनिहाय गावांचे निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. गारगोटीसह आपल्या गावात फटाक्‍यांची आतषबाजी करून मिरवणूका काढल्या.

एक मताने विजय

वाघापूर येथील प्रभाग चारमधील उमेदवार संदिप जठार व युवराज आरडे यांना समान मते मिळाली. केवळ एका टपाली मताने सत्ताधारी आघाडीचे संदिप जठार विजयी झाले. 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result