कोल्हापूरातील कळंबा, वरणगेत काँग्रेसचे सरपंच

कोल्हापूरातील  कळंबा, वरणगेत काँग्रेसचे सरपंच

दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कळंबा, वरणगे (ता. करवीर) येथे काँग्रेसचे सरपंच निवडून आले. वळिवडेत स्थानिक शेतकरी विकास आघाडीचे सरपंच विजयी झाले, तर याच ग्रामपंचायतीवर कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू सत्ता आली. तसेच, तीन अपक्षांनी बाजी मारली.

वरणगे सरपंचपदी अपर्णा पाटील
प्रयाग चिखली, ता. २८ : वरणगे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँगेस तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या सून अपर्णा अमित पाटील या सरपंचपदी ९५ मतांनी विजयी झाल्या. सरपंचांसह तीन सदस्य काँग्रेसला मिळाले. शिवसेना-भारतीय जनता पक्ष गटास पाच जागा, तानाजी आंग्रे गटास दोन जागा व अपक्ष एक असे बहुमत मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. 

विजयी उमेदवार असे : सरपंच- अपर्णा अमित पाटील, शंकराव पाटील (काँग्रेस), उल्का संजय बुचडे, सीमा शिवाजी गुरव, नामदेव बाबूराव पाटील, आमदार नरके गट- प्रकाश महादेव पाटील, विश्‍वास दौलू पाटील, सुप्रिया नितीन पाटील, चंद्रकांत अशोक मुदगल, शैलजा धनाजी पाटील, तानाजी आंग्रे गट- रंजना नारायण शिंदे, उत्तम पांडुरंग गायकवाड, अपक्ष उमेदवार भारती राजाराम कनोजे. या निवडणुकीत विद्यमान सरपंच भारती पोवार पराभूत झाल्या. त्यांना ९३ मते पडली. माजी सरपंच नामदेव पाटील यांचाही प्रभाग ४ मधून पराभव झाला.

वळिवडेच्या सरपंचपदी अनिल पंढरे 
गांधीनगर - वळिवडे (ता. करवीर) ग्रामपंचायतीसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत युवा शेतकरी विकास आघाडीच्या अनिल पंढरे यांनी ६१६ मतांनी विजय मिळवत पहिल्या थेट सरपंचपदाचा मान पटकाविला. ग्रामपंचायत त्रिशंकू झाली. सत्ताधारी श्री राजर्षी शाहू आघाडीला ७ जागा, युवा शेतकरी विकास आघाडीला ६ जागा, शेतकरी बहुजन विकास आघाडीला १ जागा; तर अपक्षांनी ३ जागा मिळविल्या. 

सरपंचपदाच्या निवडणुकीत स्थानिक युवा शेतकरी विकास आघाडीचे अनिल राजाराम पंढरे यांना २४६७  मते पडली. सत्ताधारी श्री राजर्षी शाहू आघाडीचे सुहास वसंतराव तामगावे यांना १८५१ मते पडली. शेतकरी बहुजन विकास आघाडीचे रावसाहेब आण्णू दिगंबरे यांना १४३० मते पडली. सरपंचपदी अनिल पंढरे ६१६ इतक्‍या मताधिक्‍याने निवडून आले. ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची येणार हे दोन आघाड्या आणि अपक्षांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

आघाडीनिहाय विजयी उमेदवार असे: राजर्षी शाहू आघाडी - प्रकाश रावसाहेब शिंदे, सुरेखा सुरेश चव्हाण, संगीता मधुकर चव्हाण, सुषमा उमेश शिंगे, राजाराम दत्तात्रय कुसाळे, अनिता अशोक खांडेकर, सैनाज मेहबूब नदाफ. 
युवा शेतकरी विकास आघाडी - विक्रम यशवंत मोहिते, विजय राजाराम खांडेकर, संजय बापूसाहेब चौगुले, गोपालदास सदरोमल दर्डा, प्राजक्ता प्रशांत जाधव, संगीता योगेश खांडेकर. शेतकरी बहुजन विकास आघाडी - उज्ज्वला गणपती पोवार. अपक्ष - भगवान श्रीपती पळसे, अरुण जिनपाल पोवार, वैशाली सतीश घाटगे.

कळंबा सरपंचपदी सागर भोगम
कळंबा, ता. २८ : कळंबा (ता. करवीर) येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंदपदासाठी काँग्रेस सतेज पाटील गटाचे  सागर भोगम ९७४ मतांनी विजयी झाले. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले. तर २ अपक्षांनीही बाजी मारली. सरपंचपदाचे दीपक तिवले यांना ११५२ मते मिळाली. तर बाजीराव पोवार यांना १४४८ मते मिळाली.
अन्य विजयी उमेदवार असे- प्रभाग १- राजेंद्र नारायण गुरव, विजय विश्‍वास खानविलकर, राजश्री प्रकाश पाटील. प्रभाग २-  रोहित दिलीप मिरजे, शीतल कृष्णात जंगम. प्रभाग ३- अरुण गजानन पाटील, सुहास प्रभाकर जंगम, संगीता शिवाजी तिवले. प्रभाग ४- मीना मारुती तिवले, संग्राम महादेव चौगुले, आशा मनोज टिपुगडे. प्रभाग ५- शालिनी रामचंद्र पाटील (अपक्ष), सत्यभामा अमित कांबळे, सोमनाथ लक्ष्मण शिंदे, प्रभाग ६- वैशाली संजय मर्दाने, उदय नारायण जाधव, अलका प्रकाश माने (अपक्ष).

अब्दुललाटच्या सरपंचपदी मोरे-भाट; लाटवाडीत आंबले

शिरोळ - तालुक्‍यातील अब्दुललाट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे पांडुरंग मोरे-भाट विजयी झाले. ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली. 

लाटवाडी ग्रामपंचायतीत भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीने सत्ता मिळविली. येथे सरपंचपदी यल्लव्वा आंबले विजयी झाल्या.

अब्दुललाट व लाटवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. भाजपचे जि. प. सदस्य विजय भोजे व आमदार उल्हास पाटील यांच्या आघाडीच्या विरोधात स्वाभिमानी संघटना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी अशी दुरंगी लढत प्रतिष्ठेची झाली. सरपंचपदी स्वाभिमानी, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे पांडुरंग मोरे ४६५३ मते मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी मारुती कोळी यांना ४५७० मते मिळाली. तथापि भाजप-शिवसेना आघाडीने ग्रामपंचायतीत ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली.
लाटवाडीत भाजपच्या यल्लव्वा आंबले सरपंचपदी ४३० मते मळवून विजयी झाल्या. ग्रमपंचायतीत भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी  संघटना महाआघाडीने ७ पैकी ४ जागा जिंकून सत्ता मिळविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com