कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस

सुनील पाटील
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : शहरात आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साचले. पाऊण तास झालेल्या या पावसात शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांसह अंबाबाई मंदिर परिसरात गुडघ्याऐवढे पाणी साचले होते.  यामुळे वाहतूकदारांची तारांबळ उडाली

लक्ष्मीपुरीतील रविवारच्या बाजार अक्षर:श पाण्यावर तरंगावा असेच चित्र होते . तर फोर्ड कॉर्नर, उद्यमनगर येथे रस्तावरून ओढे वाहिल्यासारखे पाणी वाहत राहिले.

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.  दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर मात्र गार वाऱ्यासह जोरदार पावसाने सुरूवात केली. बघता-बघता शहरातील रस्ते, गल्ली ओढ्यासारखे भरून वाहू लागले. आझाद चौकाकडून लक्ष्मीपुरीकडे येणारा बाजारातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.  राजारामपुरी, पाचगाव, शिवाजी विद्यापीठासह कळंबा येथे पावसाने दैना उडाली. 

Web Title: kolhapur news heavy rain in city