‘गोकुळ’च्या दूध दरात दोन रुपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दूध (गोकुळ) संघाने म्हशीच्या प्रतिलिटर दूध खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या म्हशीच्या दुधाला खरेदी करण्यासाठी ग्राहकाला आता ५२ रूपये मोजावे लागणार आहेत. आज (ता. १)पासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचे 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दूध (गोकुळ) संघाने म्हशीच्या प्रतिलिटर दूध खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या म्हशीच्या दुधाला खरेदी करण्यासाठी ग्राहकाला आता ५२ रूपये मोजावे लागणार आहेत. आज (ता. १)पासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचे 

‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले. दरम्यान,  म्हशीच्या प्रतिलिटर दुधाचा मुंबई व पुण्यातील दर हा ५४ वरून ५६ रुपये, तर इतर जिल्ह्यात ५० वरून ५२ रुपये झाला आहे; तर गाय दूध विक्रीतही दोन रुपयांची वाढ झाल्याने पुणे येथे गायीचे प्रतिलिटर दूध ४० वरून ४२ रुपये, मुंबई येथे ४३ वरून ४५ व कोल्हापुरात ३८ वरून ४० रुपयांना विक्री होईल. 
राज्यात गायीच्या प्रतिलिटर दुधाला २७ रुपये हमीभाव द्यावा, यासाठी आंदोलन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारलाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आंदोलकांनी केलेल्या मागणीनुसार गायीच्या प्रतिलिटर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची तयारी सरकारने दाखवली. हे अनुदानही उद्यापासून दिले जाणार आहे. दरम्यान, ज्या गायीच्या दुधाची पावडर निर्मिती केली जाते, अशा दुधाला हे पाच रुपयांचे अनुदान मिळेल. तसेच, जे पाऊच (पिशवी)मधून दूध विक्री केले जाते, त्या दुधाला मात्र याचा लाभ होणार नाही.

दरम्यान, २१ जुलैला गायीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उद्या याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या दरवाढीनंतर ‘गोकुळ’ने तत्काळ म्हशीच्या दूध खरेदी व विक्री दरात वाढ केल्याने दूध उत्पादकांत समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या ‘गोकुळ’कडे म्हशीचे प्रतिदिन साडेचार ते पाच लाख लिटर दुधाचे संकलन होते. सहा ते साडेसहा लाख लिटर हे गायीच्या दुधाचे संकलन होते. उद्यापासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. मात्र, खरेदी दरात दोन रुपयांची वाढ होईल. विक्री दरातही दोन रुपये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिदिन एक लिटर दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महिन्याला ६० रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत.

म्हशीचा दूध विक्री दर
दूधदर*      कोल्हापूर*      मुंबई*          पुणे 
जुना दर *    ५०*          ५४*             ५४ 
नवीन दर*    ५२*         ५८*           ५८

गायीचा दूध विक्री दर
दूधदर*      कोल्हापूर*      मुंबई*          पुणे 

जुना दर*    ३८*          ४३*             ४० 
नवीन दर*    ४०*         ४५*           ४२

फॅटप्रमाणे दर
दरम्यान, शेतकऱ्यांना म्हशीच्या सहा फॅटसाठी ३७ रुपये ४० पैसे दर मिळत होता. आता हाच दर ३९ रुपये ४० पैशांनी मिळणार आहे. जसे फॅट वाढेल तसा जास्त दर मिळेल. 
....

Web Title: Kolhapur News Hike in Gokul Milk rate by 2 rupees