अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी दवाखाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या हंगामात गर्दीने उच्चांक गाठला आहे. उन्हाळ्याच्या सुटीत विशेषतः शनिवार, रविवारी पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंदिरात कायमस्वरूपी दवाखाना सुरू होणार आहे.

मंदिर उघडल्यापासून रात्री बंद होईपर्यंत येथे भाविकांना वैद्यकीय सुविधा मिळेल. पाच-सहा वर्षांत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागली. यंदा तर दिवाळीपासूनच येथील पर्यटनाच्या हंगामाला प्रारंभ झाला. गर्दीच्या वेळी मंदिरात भाविकांना आरोग्याच्या काही तक्रारी झाल्याच तर त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात किंवा ‘सीपीआर’मध्ये न्यावे लागते. त्यामुळे देवस्थान समितीने मंदिराच्या परिसरातच दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध वैद्यकीय संघटनांतील तज्ज्ञ डॉक्‍टर्स येथे वैद्यकीय सेवा देणार आहे.

३ लाख खर्चून सुविधा
मंदिर व्यवस्थापन कार्यालयाशेजारी हा दवाखाना असेल. सुमारे तीन लाख रुपये खर्च करून येथे विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दवाखान्याबरोबरच दर्शन मंडपाची लांबी वाढवली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची व पंख्यांची सुविधाही देणार आहे. या सुविधा पंधरा दिवसांत कार्यान्वित होतील. 

भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी म्हणून मंदिर परिसरात देवस्थान समिती विविध सुविधा देणार आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत.
- महेश जाधव, अध्यक्ष, 
प. महाराष्‍ट्र देवस्थान समिती

Web Title: Kolhapur News hospital facility in Ambabai Temple