हुपरी नगराध्यक्षपदी भाजपच्या जयश्री गाट

बाळासाहेब कांबळे
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

हुपरी- नगरपालिका नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीत  भाजपच्या जयश्री गाट 2130 मतांनी विजयी झाल्या आहेत.

हुपरी- नगरपालिका नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीत  भाजपच्या जयश्री गाट 2130 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवक पदासाठीच्या 18 जागांपैकी  भाजपने  7, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने  5, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने  2, शिवसेनेने  2 तर अपक्ष  2 अशा जागा मिळविल्या आहेत.

नगराध्यक्षपदासाठी गाट यांना 7247 मते मिळाली तर ताराराणी आघाडीच्या उमेदवार सीमा जाधव यांना 5117, शिवसेनेच्या विमल जाधव यांना 1872 तर मनसे प्रणित उमेदवार गीतांजली पाटील यांना 3939 मते मिळाली. यात गाट 2130 मतांनी विजयी झाल्या.

 प्रभागवार विजयी उमेदवार असे -
 प्रभाग 1 

 •  गणेश वाईंगडे - ताराराणी आघाडी 
 • अनिता मधाळे - भाजप 

प्रभाग 2 

 • सुरज बेडगे - ताराराणी आघाडी 
 • रेवती पाटील - ताराराणी आघाडी 

प्रभाग 3 

 • अमर गजरे - मनसे आघाडी 
 • सुप्रिया पालकर - भाजप

प्रभाग 4 

 •  दौलतराव पाटील - मनसे आघाडी 
 • ऋतुजा गोंधळी - भाजप 

प्रभाग 5 

 • भरत लठ्ठे - भाजप 
 • शितल कांबळे - ताराराणी आघाडी 

प्रभाग 6 

 • जयकुमार माळगे - भाजप 
 • लक्ष्मी साळोखे - भाजप 

प्रभाग - 7 

 • रफिक मुल्ला - भाजप 
 • पूनम पाटील - शिवसेना 

प्रभाग - 8 

 • पिंटू मुधाळे - शिवसेना 
 • माया रावण - ताराराणी आघाडी 

 प्रभाग - 9 

 • संदीप वाईंगडे - अपक्ष 
 • सपना नलवडे - अपक्ष 
Web Title: Kolhapur News Hupari Nagarpalika Election