इचलकरंजी पालिकेला टाळे ठोकण्याचा माकपचा इशारा

पंडित कोंडेकर
सोमवार, 18 जून 2018

इचलकरंजी - घरफाळा वाढीचा बोजा सर्वसामान्य मिळकतधारकांवर लादल्यास प्रसंगी पालिकेला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माकपच्यावतीने देण्यात आला. याबाबत माकपने आज पालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन दिले.

आपण मिळकतधारकांच्या बाजूने ठाम आहोत. त्यामुळे घरफाळा वाढीचा बोजा मिळकतधारकांवर पडू नये, यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला नक्की यश येईल. त्यामुळे तुम्हाला आंदोलनाची वेळच येणार नाही, असे आश्‍वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी यावेळी दिले. 

पालिका सभागृहाने संयुक्त करामध्ये पाच टक्के कपात करण्याचा ठराव केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठरावाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मिळकतधारकांवर गेल्या वर्षीप्रमाणे 20 टक्के घरफाळ्याचा बोजा पडणार आहे. 
त्या पार्श्‍वभूमीवर माकपने आज नगराध्यक्षा स्वामी यांना निवेदन सादर केल्या.

यावेळी घरफाळा वाढीबाबत आपल्या तीव्र भावना मांडल्या. शासकीय पातळीवर प्रयत्न करुन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेश रद्द करुन मिळकतधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चर्चेत माकपचे ए.बी.पाटील, दत्ता माने, आनंदराव चव्हाण, बाळनाथ रावळ, सदा मलाबादे, पार्वती जाधव, साहेबलाल मुल्ला, धनाजी जाधव यांच्यासह नगरसेवक अजितमामा जाधव, तानाजी पोवार यांनी भाग घेतला.

Web Title: Kolhapur News Ichalkaraji Palika Makap agitation