पावसाच्या शक्‍यतेने कोल्हापुरात आंब्याची वाढली आवक

राजकुमार चाैगुले, बी. डी. चेचर
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - येथील बाजारसमितीत गेल्या दोन दिवसांपासून आंब्याची आवक वाढली आहे. वादळी पाऊस होवून आंब्याचे नुकसान होइल या शक्‍यतेने कोकणातून जास्त प्रमाणात आंबा येथील बाजारसमितीत येत आहे. दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक बाजारसमितीत होत आहे. 

कोल्हापूर - येथील बाजारसमितीत गेल्या दोन दिवसांपासून आंब्याची आवक वाढली आहे. वादळी पाऊस होवून आंब्याचे नुकसान होइल या शक्‍यतेने कोकणातून जास्त प्रमाणात आंबा येथील बाजारसमितीत येत आहे. दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक बाजारसमितीत होत आहे.

यंदा आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍यांनी घटलेली आहे. यामुळे मे उजाडला तरी आंब्याच्या आवकेत फारशी वाढ होत नव्हती. दराचा अंदाज घेवून थोड्या थोड्या प्रमाणात आंब्याची आवक होत होती. परंतू आठ दिवसांपूर्वी कोकणासह अन्य ठिकाणी ढगाळ हवामानामुळे बागायतदारांनी झाडावरील आंबे उतरवून तातडीने ते बाजारपेठेत पाठविण्यास प्राधान्य दिले. एखादा जोराचा पाऊस झाल्यास सर्वच आंब्याचे नुकसान होवू नये. यासाठी बागायतदारांनी आंबे कोल्हापुरच्या बाजारपेठेत पाठविण्यास प्रारंभ केला आहे. बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्याची माहिती फळ विभागाच्या सुत्रांनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर कोकणातील बेळगाव, बंगळुरू येथूनही हापूस आंब्याची आवक सुरु झाल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. 

कोल्हापूर बाजारसमितीत गुरुवारी (ता.10) देवगड हापूस आंब्यास डझनास 100 ते 400, पायरीस 100 ते 250, कर्नाटक हापूसला 100 ते 200 तर कर्नाटक पायरीस 50 ते 150 रुपये दर मिळाला. 

सध्या बाजारसमितीत रत्नागिरी, कर्नाटक, मालवण येथून आवक चांगली होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांत आवकेत वाढ झालेली आहे. 

- मुसा बागवान, आंबा व्यापारी 

पावसाच्या शक्‍यतेमुळे कोकणासह कर्नाटकातून आंब्याची वाढत एकदम वाढल्याने दराच घसरण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात आंब्याची आवक वाढण्याची शक्‍यता आहे. 

- नईम बागवान, अध्यक्ष 
ररुट मर्चट असोसिएशन, कोल्हापूर 

Web Title: Kolhapur News Import of Mango in Market committee