होय, मला महापौर व्हायचंय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

कोल्हापूर - होय, मला महापौर व्हायचंय.., असे सांगत काँग्रेसच्या इच्छुक महिला उमेदवार आज संयुक्तपणे मुलाखतीस सामोरे गेल्या. आमदार सतेज पाटील यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. मुलाखतीवेळी कोणते प्रश्‍न विचारणार याची धाकधूक इच्छुकांना होती, मात्र सतेज पाटील यांनी एकाचवेळी सर्वांना बोलावून त्यांची मते जाणून घेतली. सोमवारी (ता. २१)  दुपारी चार वाजता महापौर उमेदवाराचे नाव जाहीर करू, असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी सायंकाळी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या आमदार हसन मुश्रीफ यांनी मुलाखती घेतल्या. उपमहापौरपदासाठी नगरसेवक महेश सावंत, सचिन पाटील इच्छुक आहेत. पैकी सावंत आज अनुपस्थित राहिले. त्यामुळे सचिन पाटील यांची मुलाखत झाली. महिला सर्वसाधारण गटासाठी महापौर पद राखीव आहे. काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा सहा महिन्यांसाठी पद येत आहे. 

सोमवारी (ता. २१) दुपारी तीन ते पाच यावेळेत उमेदवारी अर्ज सादर करतील. दुपारी काँग्रेस समितीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. शोभा बोंद्रे, इंदूमती माने, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, दिपा मगदूम, निलोफर आजरेकर उपस्थित होत्या. प्रत्येकीस स्वतंत्रपणे बोलावून मुलाखत होणार का? याची उत्सुकता होती. मात्र पाटील यांनी एकाचवेळी उमेदवारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. महिला उमेदवारांचे नातवाईक बाहेर थांबून होते. मुलाखतीनंतर बाहेर पडल्यानंतर सहा महिला उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांच्यानंतर बाहेर जी काँग्रेसची मंडळी त्यांच्याशी पाटील यांनी चर्चा केली.

महापौर पदासाठी आपण कसे योग्य आहोत हे सांगण्यासाठी पाटील यांच्या पुर्वीच वैयक्तीक स्तरावर गाठीभेटी झाल्या आहेत. त्यामुळे नव्याने मुलाखतीची गरज नाही, असा सूर होता. खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखती पार पाडल्या. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गटनेता शारंगधर देशमुख यांच्यासह कांग्रेस नगरसेवक उपस्थित होते.

उपमहापौरपदासाठी कोण?
दरम्यान, सायंकाळी शासकीय विश्रामधाम येथे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमहापौर पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सचिन पाटील यांनी मुलाखत दिली. स्थायी समिती निवडीवेळी राष्ट्रवादीतून फुटलेले नगरसेवक अफजल पिरजादे, अजिंक्‍य चव्हाण आजही गैरहजर राहिले. आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, गट नेता सुनील पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, नगरसेविका सरिता मोरे, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News interview for Mayor selection