इराणी टोळीच्या म्होरक्‍याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - पाच दिवसांपूर्वी किणी (ता. हातकणंगले) येथे घडलेल्या सोनसाखळी प्रकरणाचा छडा लावीत कुख्यात इराणी टोळीच्या म्होरक्‍याच्या मुसक्‍या आवळण्यास येथील स्थानिक प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले. अटक केलेला म्होरक्‍या हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांचे अन्य चार साथीदार पोलिसाची चाहूल लागताच पसार झाले.
असगर ऊर्फ बंटी इजाज इराणी (वय २४, रा. इराणी मस्जिद जवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

याबाबत रात्री उशिरा पेठवडगाव पोलिसात नोंद झाली. कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, कॉन्स्टेबल महेश कोरे, वैभव दड्डीकर, रणजित पाटील, विजय तळसकर, राजू पट्टणकुडे, ज्ञानेश्‍वर बांगर, संजय फडतारे, सागर पाटील, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, संजय मळघणे आदीच्या पथकाने केली. टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

किणी, वड्डवाडी (ता. हातकणंगले) येथील माधुरी विशाल पाटील ही विवाहिता रविवारी (ता. २९) सकाळी गावातील जैन मंदिरात पूजेसाठी जात होती. त्या वेळी असगर ऊर्फ बंटी इराणी आणि त्यांच्या साथीदारांनी धूम स्टाईलने मोटारसायकलवरून तिचे सोन्याचे चार तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र असे साडेचार तोळ्याचे दागिने हिसडा मारून पलायन केले होते. या चोरीची पेठवडगांव पोलिसात नोंद झाली होती.

घटनेची गांभीर्याने दखल घेऊन येथील स्थानिक प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान सोनसाखळी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असगर ऊर्फ बंटी इराणी आणि त्यांच्या टोळक्‍याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान पोलिसांना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील एका हॉटेलशेजारी असगर ऊर्फ बंटी इराणी सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने किणी येथील सोनसाखळी चोरीची कबुली दिली.

वर्णनावरून पकडले
माधुरी पाटील हिने दागिने हिसडा मारून पोबारा करताना चोराचे वर्णन पोलिसांना सांगितले होते. यावरून चोरीचा गुन्हा इराणी टोळीने केल्याचे निष्पन्न केले. त्यावरून इराणी टोळीचा म्होरक्‍या इराणी याला अटक केली. तसेच त्यांच्यासह साथीदाराविरुद्ध जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात सोनसाखळी, घरफोड्या, मोटारसायकली चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Kolhapur News Irani Gang chief arrested