आयटीआयसाठी प्रतीक्षा वेळापत्रकाची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया - अकरावी प्रवेशाची तारीख दोन दिवसांत जाहीर  
कोल्हापूर - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. दोन-तीन दिवसांत याबाबत अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षीही आठवडाभर ही प्रक्रिया रेंगाळली होती. त्यानंतर सहा फेऱ्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली होती.  

यंदाही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच ही प्रक्रिया होणार असून तीसहून अधिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया राबवली जाईल. त्यात एक वर्ष आणि दोन वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश असेल. राज्यातून कुठूनही विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो; मात्र एकूण प्रवेश प्रक्रियेत सत्तर टक्के जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि तीस टक्के बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सर्व अभ्यासक्रमांसाठी मुलींना तीस टक्के जागा राखीव तर खास मुलींसाठी विशेष अभ्यासक्रमही आता उपलब्ध झाले आहेत. 

कोल्हापूर ‘आयटीआय’ची देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रशिक्षण संस्था म्हणून लौकिक आहे. तीन शिफ्टमध्ये येथे विविध अभ्यासक्रमांसाठीचे प्रशिक्षण दिले जाते. वसतिगृहाची सोयही येथे उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरसाठी आयटीआय मोठा आधारवड आहे. येथील प्रवेश प्रक्रियेचा आजवरचा इतिहास पहाता ड्राफ्टस्‌मन, मशिनिस्ट, इलेक्‍ट्रिशियन, मोटर मेकॅनिक अशा काही अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८५ ते ९५ टक्‍क्‍यांपर्यंतचे मेरिट लागले आहे. 

३५ महाविद्यालये
अकरावीसाठी यंदाही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार सुमारे तेरा हजार चारशेवर जागांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. शहरातील पस्तीस महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असून प्रवेश प्रक्रियेची तारीख दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रभारी अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news iti wait timetable