रसायनमिश्रित गूळ बनविणाऱ्या दोन गुऱ्हाळघरांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

कोल्हापूर - अन्न व औषध प्रशासनाने चंद्रे (ता. राधानगरी) येथे साखर आणि रसायनमिश्रित गूळ बनविणाऱ्या दोन गुऱ्हाळघरांवर कारवाई केली. या कारवाईत गुळात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी साखर, विविध प्रकारची अखाद्य रसायने, तयार केलेला गूळ असा १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्याचबरोबर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये विना परवाना गुऱ्हाळघर चालवल्याप्रकरणी कायमस्वरूपी गुऱ्हाळ घर चालवण्यास बंदी नोटीस देण्यात आली आहे. ‘साम’ टीव्हीने या प्रकरणी सातत्याने आवाज उठविला होता. 

जिल्ह्यातील गुऱ्हाळामध्ये साखरेचा वापर गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅन्ड धोक्‍यात आला आहे. यामुळे असे प्रकार बंद करण्याबाबत विविध स्तरावरुन प्रयत्न सुरू होते. बाजार समितीनेही हंगाम सुरू झाल्यापासून दोन वेळा बैठका घेऊन साखर मिश्रीत गूळ करू नये; असे आवाहन केले होते, पण हे प्रकार बंद न झाल्याने अखेर अन्न व औषधने गुऱ्हाळघरावर छापे टाकून ही कारवाई केली.  

जप्त केलेल्या मुद्देमालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Jaggery adulteration action on Jaggery factory