जयसिंगपूर पोलिस ठाणे आयएसओ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

जयसिंगपूर - येथील पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकनाने गौरविण्यात आले. पोलिस ठाण्यातील विविध विभागांची रचना, अद्ययावत रेकॉर्ड, सुरक्षिततेच्यादृष्टीने असणाऱ्या उपाययोजना, नेटकेपणा, पोलिस ठाण्यात येणाऱ्यांची घेतली जाणारी दखल आदी बाबी लक्षात घेऊन पोलिस ठाण्याला या मानांकनाने गौरविण्यात आले. 

लोकसहभागातून पोलिस ठाण्याची इमारत उभारण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर मंदिर आणि दिगंबर जैन मंदिरातील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. शिवाय गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यातही यश आले आहे. पोलिस ठाण्याच्या इमारतीत विविध विभागांची आदर्श रचना, गुन्ह्यांची उकल करण्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग, न्याय मागण्यासाठी येणाना दिली जाणारी वागणूक या बाबी लक्षात घेऊन पोलिस ठाण्यास आय.एस.ओ.9001: 2015 प्रमाणपत्राने गौरव करण्यात आला. 

आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळवणारे जयसिंगपूर हे तालुक्‍यातील दुसरे पोलिस ठाणे ठरले आहे. याआधी शिरोळ पोलिस ठाण्यालाही या प्रमाणपत्राने गौरवण्यात आले आहे. जयसिंगपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचाही गत वर्षी गौरव झाला आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीचा गौरव झाला आहे. 

पोलिस ठाण्याला मानांकनाने गौरविण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यालाच प्रमाणपत्र मिळाले आहे. या मानांकनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या कामालाही चालना मिळणार आहे. मानांकनाला साजेसे कामकाज यापुढेही करणार आहे. जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांचेही यासाठी मार्गदर्शन मिळाले. 

- दत्तात्रय कदम, सपोनि, जयसिंगपूर पोलिस ठाणे 

Web Title: Kolhapur News Jayasingnpur Police Station ISO