जोतिबा देवाची चैत्र यात्रा ३१ मार्चला

निवास मोटे 
मंगळवार, 13 मार्च 2018

जोतिबा डोंगर - श्री जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा येत्या ३१ मार्च रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

जोतिबा डोंगर - श्री जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा येत्या ३१ मार्च रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

यात्रा तयारी निमित्ताने डोंगरावर लगबग दिसून येत आहे. मंदिराच्या शिखराची रंगरंगोटी करण्यासाठी प्रथम शिखरे स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. येत्या २३ तारखेला या यात्रेच्या नियोजनासाठी शासकीय यंत्रणेची विशेष बैठक होत आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस प्रमुख संजय मोहीते, शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी यमाईदेवी मंदीर परिसरात सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. दुकानदार व्यापारी वर्ग दुकानात गुलाल खोबऱ्याची पॅकिंग करताना दिसत आहेत. गुढीपाडवा शुभ मुहूर्तावर या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. 

Web Title: Kolhapur News Jotiba Devache Chaitra Yatra on 31 March