कागल भक्त मंडळाची कागल-कोल्हापूर पायी दिंडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर पुजारीमुक्त करण्याची बुद्धी शासनाला दे, असे साकडे कागलच्या अंबाबाई भक्त मंडळ व कागल तालुका पुजारी हटाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईला घातले. 

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून शासननियुक्त पुजारी नेमावेत, या प्रमुख मागणीसाठी आज कागल ते कोल्हापूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कागलच्या प्रसिद्ध राम मंदिरापासून सकाळी साडेसहाला या दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीत कागल अंबाबाई भक्त मंडळाचे दीडशेपेक्षा जास्त पदाधिकारी सहभागी झाले होते. 

"अंबामाता की जय', "पुजारी हटाओ अंबाबाई बचाओ' अशा घोषणा देत ही दिंडी गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी फाटा, विद्यापीठ, सायबर चौक येथे पोचली. सायबर चौकात आम आदमी पक्षातर्फे आलेल्या भक्तांना चहा, अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. शहरातील उमा चौकमार्गे दिंडी शिवाजी चौक पुतळ्याजवळ पोचली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून दिंडी भवानी मंडपमार्गे अंबाबाई मंदिरात पोचली. अंबाबाई भक्त समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. 

दरम्यान, अंबाबाई मंदिरात पितळी उंबऱ्याजवळ उभे राहून आलेल्या भक्तांनी पुजारी हटविण्याची बुद्धी शासनाला दे, असे साकडे अंबाबाईला घातले. मंदिरातील सर्व उत्पन्न शासनजमा होऊन त्यातून समाजोपयोगी कामे घडावीत, अशी प्रार्थना करण्यात आली. इंद्रजित घाटगे, संजय चितारी, सागर घाडगे, सागर कोंडेकर, आबा चव्हाण, कृष्णा धनगर, बंडू शिरोळे, राजू कत्रे, बंडा बारड, संजय गोनुगडे आदी कागल तालुक्‍यातील भक्त उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news kagal