कोल्हापुरात लवकरच कन्हैया कुमारांची सभा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - बहुचर्चित कन्हैया कुमार यांची जाहीर सभा लवकरच कोल्हापुरात होत आहे. त्याचा सांगावा सोशल मीडियातून सुरू झाला आहे. ‘कमिंग सून कन्हैया कुमार’ असे फलकही शहरभर लागणार आहेत. ‘सॅन्ड आर्ट’च्या माध्यमातून कन्हैया कुमार यांचा बनविलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.

कोल्हापूर - बहुचर्चित कन्हैया कुमार यांची जाहीर सभा लवकरच कोल्हापुरात होत आहे. त्याचा सांगावा सोशल मीडियातून सुरू झाला आहे. ‘कमिंग सून कन्हैया कुमार’ असे फलकही शहरभर लागणार आहेत. ‘सॅन्ड आर्ट’च्या माध्यमातून कन्हैया कुमार यांचा बनविलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चेत असलेले कन्हैया कुमार कोल्हापुरात काय बोलणार, याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

कन्हैया कुमार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत. बिहारमध्ये जन्मलेल्या कन्हैया कुमार यांनी दिल्लीतील जेएनयूमध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी उच्चभ्रूंच्या शिक्षण पद्धतीवर आवाज उठविला होता. त्यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयूमध्ये आंदोलन केले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कन्हैया कुमार देशभरात गाजले गेले आहेत. 

याच कन्हैया कुमार यांची जाहीर सभा कोल्हापुरात होत आहे. दसरा चौक, केशवराव भोसले नाट्यगृहासह अन्य ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. ८ किंवा ९ नोव्हेंबर यापैकी एका दिवशी सभेचे नियोजन आहे. तरुणाईकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कमिंग सून कन्हैया कुमार’ व्हायरल करण्यात येत आहे. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एका वाचनालयाच्या उद्‌घाटनानंतर त्यांची सभा होण्याची शक्‍यता संयोजकांकडून वर्तविली जात आहे.

Web Title: Kolhapur News Kanhaiya Kumar comming soon in city