कापशी - गडहिंग्लज मार्गावरील वाहतुक सुरु 

कापशी - गडहिंग्लज मार्गावरील वाहतुक सुरु 

सेनापती कापशी - येथील तमनाकवाडा रस्त्यावर आंबेओहळजवळ रस्त्यात गुरुवारी मध्यरात्री पडलेले मोठे झाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली.

गुरुवारी रात्री रस्ता बंद झाल्याने सकाळी गडहिंग्लज, निपाणी व कापशीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसची कोंडी झाली. दूध वाहतुक व नोकरीसाठी जाणारे तसेच कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत जाता आले नाही. बाभळीचे खूप मोठे झाड असल्याने ते सहज बाजूला करणे शक्य नव्हते. त्यामुळे सकाळी अनेक वाहने येथे पर्यंत येऊन मागे परतत होती. काही वाहन चालकांनी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घेऊन बाळेघोलमार्गे जाणे पसंद केले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता एस. व्ही. बारवेकर यांनी त्वरित हालचाली करून कर्मचारी पाठवले. यासाठी रस्ता ठेकेदार राजू इनामदार यांनी जेसीबी दिले. दिग्विजय मांगोरे, असिफ मनोळी यांनी झाड बाजूला करण्यात मदत केली. त्यामुळे रात्रभर खोळंबलेली वाहतूक सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com